घरमुंबईके/पूर्व विभागातील सर्वच कंत्राटे मिळवणारा शांतीलाल कोण?

के/पूर्व विभागातील सर्वच कंत्राटे मिळवणारा शांतीलाल कोण?

Subscribe

या प्रकाराची ईडीमार्फत चौकशी करण्याची नगरसेवकाने मागणी केली आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत रस्ते, नालेसफाई, झाडांच्या फांद्यांची छाटणी आदी प्रकारच्या कामांसाठी कंत्राट कामांना मंजूरी दिली जाते. परंतु स्थायी समितीत मंजूर करण्यात आलेला कंत्राटदार प्रत्यक्षात कामच करत नसून के/पूर्व विभागामध्ये सर्व प्रकारची कामे शांतीलाल नावाचाच कंत्राटदार करत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कामे न घेणारा हा शांतीलाल कोण? असा सवाल करत या कामांची अंमलबजावणी संचनालय(ईडी)मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेवक अभिजीत सामंत यांनी केली आहे.

ईडी मार्फत चौकशी चौकशीची मागणी

पश्चिम उपनगरातील २३४ सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवरील सांधे भरण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला असता, अभिजीत सामंत यांनी के-पूर्व विभागात सर्व प्रकारची कामे शांतीलाल नावाचाच कंत्राटदार करत असल्याचा गौप्यस्फोट केला. रस्त्यांची कामे असो वा नाले सफाईची कामे असो वा वृक्षतोडीची कामे असो, सर्व कामे शांतीलाल नावाच कंत्राटदार करत असून प्रत्यक्षात ती कामे या स्थायी समितीत अन्य कंत्राटदाराच्या नावाने मंजूर करण्यात आलेली आहेत. मग हा शांतीलाल कोण? असा सवाल करत त्यांनी या प्रकरणांची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

- Advertisement -

हेही वाचा – रेनिसन्स हॉटेलमध्ये भाजपकडून लोकशाहीचे वस्त्रहरण – अशोक चव्हाण

कंत्राटदाराला पाठिशी घालणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा

नालेसफाईचे काम करण्यासाठी या कंत्राटदाराने गर्दुल्ल्यांना कामाला लावले होते. विलेपार्ले तेजपाल स्कीमधील नाल्याची सफाई करताना, या गर्दुल्ल्यांना लोखंडी जाळ्याच चोरुन नेल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे अशा कंत्राटदाराला पाठिशी घालणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी. यासाठी स्थायी समितीला तिसरा डोळा उघडण्याची वेळ आल्याचाही इशारा त्यांनी दिला.

प्रशासनाचे स्पष्टीकरण

सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे सांधे भरण्याचे हे काम २०० ते ३०० किलोमीटर लांबीचे असून सहा महिन्यात ते पूर्ण करणार कसे? असा सवाल भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केला. यावर प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवरील हे सांधे डांबराच्या सहाय्याने बुजवले जातील, असे स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -