घरमुंबईसमीर वानखेडेंविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्नी क्रांतीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…

समीर वानखेडेंविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्नी क्रांतीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…

Subscribe

मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर ड्रग्जच्या वादग्रस्त छाप्याचे नेतृत्व केले आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अटक केली होती. या प्रकरणी वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti redkar) हिने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्यन खान प्रकरणी एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी माजी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यातील आठ कोटी वानखेडे यांना मिळणार होते, असा गंभीर आरोप प्रभाकर साईल यांनी केला होता. या आरोपांची गंभीर दखल घेत एनसीबीच्या दक्षता विभागामार्फत समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात सीबीआयने रविवारी (14 मे) छापेमारी केली. यानंतर समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

घरावर पडलेल्या छाप्यानंतर समीर वानखेडे प्रतिक्रिया देताना सांगितले की, माझ्या घराची 12 तासांपेक्षा जास्त वेळ झडती घेण्यात आली. यावेळी सीबीआयला माझ्या घरातून फक्त १८ हजार रुपये आणि इतर मालमत्तेची 4 कागदपत्र सापडली आहेत. ही संबंधित मालमत्ता मी सेवेत रुजू होण्यापूर्वी विकत घेतली होती. परंतु मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळत आहे, असा आरोप समीर वानखेडे यांनी केला आहे.

समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तिने म्हटले की, सर्वांना माहिती आहे समीर वानखेडे यांच्यावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप चुकीचे आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून सीबीआयला सहकार्य करणार आहोत.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?
ऑक्टोबर 2021 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई विभागाचे संचालक होते. यावेळी त्यांनी कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह २० जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यन खानला एक महिन्यानंतर पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. परंतु निर्दोष मुक्तता करण्यासाठी समीर वानखेडेंनी शाहरूखकडे 25 कोटींची मागणी केली होती. त्यानंतर ही रक्कम 18 कोटींवर निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात होते. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या व्यतिरिक्त आणखी दोन अधिकाऱ्यांची नावे समोर आली होती. या प्रकरणात मध्यस्थी म्हणून केव्ही गोसावी आणि त्याचा सहकारी सॅनविले डिसोझा यांना ठेवण्यात आले होते. यावेळी टोकन म्हणून 50 लाख रुपये देखील घेण्यात आले होते, असे आरोप होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -