घरमुंबईविलेपार्ले येथे चरस विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक

विलेपार्ले येथे चरस विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक

Subscribe

विलेपार्ले येथे चरस विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला मंगळवारी जुहू पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. हर्षल शंकर परुळेकर असे या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी सहाशे ग्रॅम वजनाचा चरसचा साठा जप्त केला आहे. या चरसची किंमत सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर हर्षलला अंधेरीतील लोकल कोर्टाने 11 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हर्षल हा जुहू येथील जुहू चर्च परिसरात राहत असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात चरसचा साठा आहे, त्याची विक्रीसाठी तो विलेपार्ले येथील व्ही. एम. रोडवरील पुष्पा पार्कजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर जुहू पोलिसांच्या एका विशेष पथकाने मंगळवारी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून हर्षल परुळेकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

- Advertisement -

यावेळी त्याच्या अंगझडतीत पोलिसांना सहाशे ग्रॅम वजनाचे चरस सापडले. उच्च प्रतीच्या या चरसची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला ते चरस कोणी दिले, तो चरस कोणाला देणार होता, या गुन्ह्यांत त्याचे इतर काही सहकारी आहेत का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -