घरमुंबईशिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीव मुठीत

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीव मुठीत

Subscribe

कसार्‍यातील शाळा धोकादायक

शहापूर तालुक्यातील कसारा, वाशाळा केंद्रांतर्गत येणार्‍या अनुक्रमे विहिगाव बौद्धवाडा तसेच आगाणवाडी, कोथळा, वेळूक येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. धोकादायक झालेल्या या प्राथमिक शाळा पाडून तेथे नवीन इमारत उभारण्याचे प्रस्ताव वर्षभरापासून जिल्हा परिषदेकडे रखडल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षांतही विद्यार्थ्यांना त्याच धोकादायक वर्गात जीव मुठीत घेऊन बसावे लागत आहे.

अशा धोकादायक आणि नादुरुस्त शाळांसाठी गटशिक्षणाधिकारी व जि.प. बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी संयुक्त पाहणी दौरा करणे गरजेचे आहे. या वर्ग खोल्यांची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी तर काही ठिकाणी सातवीपर्यंत वर्ग आहेत. मात्र, या शाळांची दयनीय अवस्था झाल्याने जोरदार पावसात मोठी दुर्घटना घडण्याचा धोका आहे. या शाळांच्या स्थितीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.

- Advertisement -

धोकादायक इमारतींचे प्रस्ताव सादर झाले असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जि.प.बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांकडून संबंधित धोकादायक इमारतीचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात येईल. शिवाय नादुरुस्त शाळांच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीनुसार आराखडा तयार करण्यात येईल.
-एच.वेखंडे, प्रभारी गटशिक्षण अधिकारी,पंचायत समिती, शहापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -