घरनवी मुंबईमिनी मंत्रालयात जीएसटी विभागाचे असहकार आंदोलन सुरुच

मिनी मंत्रालयात जीएसटी विभागाचे असहकार आंदोलन सुरुच

Subscribe

केद्रांने २०१७ मध्येच विभागाची पुनर्रचना करुन यंत्रणा सक्षम केली आहे. ६ वर्षाहून अधिक कालावधी होऊन देखील अद्याप महाराष्ट्र राज्य कर विभागाने पुनर्रचना केली नाही. त्यामुळे विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची प्रचंड घुसमट होत असून त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे.

नवी मुंबई-: केंद्र शासनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने जीएसटी विभागाची पुनर्रचना ( Restructuring of GST Department) करावी. यासाठी ३० ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या आंदोलनाला राजपत्रित अधिकारी महासंघ कोकण भवन युनिट यांनी पाठिंबा दर्शविला आहे. जीएसटी विभागाच्या (Gst seva worker) असहकार आंदोलनाचा बुधवारी (ता.१) तिसरा दिवस होता. जीएसटी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी  संपूर्ण दिवसभर असहकार आंदोलनात सहभागी होते. गांधी टोपी परिधान करुन आंदोलन केले.

- Advertisement -

वस्तू व सेवा कर जीएसटी कायद्याची अंमलबजावणी ०१ जुलै,२०१७ पासून देशभरात झाली. राज्य व केंद्र शासनाच्या तब्बल चौदा करांचे विलनीकरण होऊन वस्तू व सेवा कर कायद्या अस्तिवात आला आहे. सध्या केंद्र व राज्य कर विभाग समान तत्वावरती या कायद्याची अंमलबजावणी करीत आहेत.

केद्रांने २०१७ मध्येच विभागाची पुनर्रचना करुन यंत्रणा सक्षम केली आहे. पंरतु ६ वर्षाहून अधिक कालावधी होऊन देखील अद्याप महाराष्ट्र राज्य कर विभागाने पुनर्रचना केली नाही. त्यामुळे विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची प्रचंड घुसमट होत असून त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. यासाठी वेळोवेळी पाठपुरावा आंदोलने करुनही प्रश्नाची शासनदरबारीय दखल घेण्यात आलेली नाही. यासाठी हे तीव्र आंदोलन सुरु केले आहे.

- Advertisement -

आंदोलनात राजपत्रित अधिकारी महासंघ कोकणभवन युनिटचे अध्यक्ष डॉ.गणेश मुळे, सचिव डॉ.गणेश धुमाळ, तसेच गट अ आणि ब कर्मचारी संघटना गट क कर्मचारी संघटना सहभागी होत्या. कमलेश नागरे,सह सचिव, निलेश जैन उपाध्यक्ष, सुबोध लवटे, सदस्य, विकास कडाळे, अश्विनी चौधरी यांच्यासह मोठया संख्येने अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -