घरपालघरडहाणू नगर परिषदेची ६.५० कोटींची कर वसुली

डहाणू नगर परिषदेची ६.५० कोटींची कर वसुली

Subscribe

आणि येत्या काही दिवसांत नगर परिषद घर नोंदणी नुसार पूर्ण कर रक्कम जमा होईल, अशी अपेक्षा कर वसुली करणार्‍या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

डहाणू: डहाणू नगर परिषद अंतर्गत येणार्‍या सर्व कर धारकांकडून या वर्षाची घरपट्टी ही अपेक्षा प्रमाणे कमी आली. दरवर्षी प्रमाणे कर वसुली ही सुमारे 9 कोटी 10 लाख रुपये एवढी जमा व्हायची. मात्र या वर्षी संगणक प्रणालीतील तांत्रिक अडचण आल्याने वसुली पूर्ण झाली नाही. कर पावत्या या हाताने लिहाव्या लागत असल्याने कामात अडथळा निर्माण होत होता. परंतु त्यानंतर नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी विशेष लक्ष देत शहरात सर्वत्र यांबाबत जाहिरात फलक लावल्या कारणाने लोकांमध्ये जनजागृती करत या वर्षाची सुमारे 6.50 कोटी एवढी रक्कम कर स्वरूपात जमा झाली असून दरवर्षी प्रमाणे या वर्षी कर रकमेत घट झाली आहे. परंतु अजून कर वसुली चालूच आहे आणि येत्या काही दिवसांत नगर परिषद घर नोंदणी नुसार पूर्ण कर रक्कम जमा होईल, अशी अपेक्षा कर वसुली करणार्‍या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

 

- Advertisement -

सध्या वर्ष अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात करदात्यांनी सहकार्य करून कर भरणा सुरू केलेला आहे. काही तांत्रिक अडचणी आल्याने करदात्यांना थोडा त्रास झाला असेल. पण असेच सहकार्य करून नगर परिषद हद्दीतील सर्वांनी कर भरणा करून असेच सहकार्य करावे.

– वैभव आवारे, प्रशासक तथा मुख्याधिकारी, डहाणू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -