घरक्रीडाIPL 2024 : आयपीएलमध्ये शाहरूख खानचा दबदबा; कोलकाताचा संघ अव्वल स्थानी

IPL 2024 : आयपीएलमध्ये शाहरूख खानचा दबदबा; कोलकाताचा संघ अव्वल स्थानी

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 पर्वात अभिनेता शाहरूख खान याचा दबदबा पाहायला मिळत आहे. कारण आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत शाहरुख खानचा संघ म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स हा अव्वल स्थानी आहे. तसेच, कोलकाताने आयपीएलच्या सर्वाधिक धावसंख्येच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या प्रत्येक पर्वात एखादा संघाने उत्तर खेळी करत गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवले तर, त्या संघाच्या संघ मालकाची चर्चा होत असते. यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघ मालक काव्या मारन हीची चर्चा रंगली होती. कारण 33 वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. तसेच, काव्या ही सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. काव्याची एकूण संपत्ती 409 कोटी रुपये आहे. त्यामुळे हैदराबादच्या प्रत्येक सामन्याला तिची क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा रंगते. मात्र सध्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा देखील आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आला आहे. तसेच, यंदाच्या आयपीएलमध्ये त्याचा दबदबाही पाहायला मिळत आहे. (IPL 204 Shah Rukh Khan dominates IPL Kolkata team is top in point table)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 पर्वात अभिनेता शाहरूख खान याचा दबदबा पाहायला मिळत आहे. कारण आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत शाहरुख खानचा संघ म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स हा अव्वल स्थानी आहे. तसेच, कोलकाताने आयपीएलच्या सर्वाधिक धावसंख्येच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाताना 272 धावांचे आव्हान दिल्लीसमोर ठेवले होते. याआधी सनरायझर्स हैदराबादने 277 धावांचे आव्हान मुंबई इंडियन्स समोर ठेवत सर्वाधिक धावसंख्येच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Rishabh Pant : आयपीएलच्या 17 व्या पर्वात ऋषभ पंतवर दंडात्मक कारवाई; धीम्या गतीच्या गोलंदाजीचा फटका

- Advertisement -

आयपीएलच्या 17 व्या पर्वात आतापर्यंत सर्वच सामने अतितटीचे पाहायला मिळत आहेत. बुधवार, 3 एप्रिलपर्यंत IPL 2024 मध्ये एकूण 16 सामने खेळले गेले. या सामन्यांनंतर कोलकाता नाइट रायडर्स (KKR) सध्या IPL 2024 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) शेवटच्या स्थानावर आहे.

दरम्यान, यंदाच्या IPL 2024 मधील प्लेऑफचे सामने 21 मे पासून सुरू होणार आहेत. तसेच, अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे. पहिला क्वालिफायर सामना 21 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यानंतर याच मैदानात 22 मे रोजी एलिमिनेटर सामना होणार आहे. तर, 24 मे रोजी दुसरा आयपीएल क्वालिफायर सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


हेही वाचा – Suryakumar Yadav: हार्दिक पांड्यासाठी गूड न्युज; टी-20 चा नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादव लवकरच परतणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -