घरपालघर पोलीस आयुक्तलयात प्रशिक्षण पूर्ण करून ९९६ नवीन पोलीस कर्मचारी दाखल

 पोलीस आयुक्तलयात प्रशिक्षण पूर्ण करून ९९६ नवीन पोलीस कर्मचारी दाखल

Subscribe

प्राप्त झालेल्या ७१ हजार ९५१ अर्जांमध्ये ५९ हजार ८४७ पुरुष व १२ हजार १०४ महिला उमेदवारांचा समावेश होता.

भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तलयामध्ये नवीन पोलीस भरती करण्यात आली होती. या पोलीस कर्मचाऱ्यांना भरती झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, त्यामुळे
नवीन भरती झालेले ९९६ पोलीस कर्मचारी पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत. आता त्यांच्या नेमणुका व नियुक्ती देण्याचे काम होणार आहे. पोलीस आयुक्तलयाच्या ताफ्यात ९९६ नवीन कर्मचारी प्राप्त होणार असल्याने आयुक्तलयातील मनुष्य बळाची संख्या वाढणार असून वाहतूक विभागासह पोलीस ठाण्यातील बराच कामाचा ताण कमी होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त मधुकर पांडे व अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली आहे. मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत पोलीस शिपाई व चालक पदांसाठी २ जानेवारी २०२३ पासून थेट भरती प्रक्रियेला सुरुवात झाली होती. ९९६ पदांच्या जागासाठी ही भरती करण्यात आली आहे. मुला- मुलींची शारीरिक चाचणी पूर्ण झाल्यानंतर १२ हजार उमेदवार लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले होते. पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर प्रथमच थेट पोलीस भरती झाली आहे. या पदांसाठी सुमारे ७१ हजार अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त झालेल्या ७१ हजार ९५१ अर्जांमध्ये ५९ हजार ८४७ पुरुष व १२ हजार १०४ महिला उमेदवारांचा समावेश होता.
भरतीसाठी आलेल्या अर्जदारापैकी एकूण ४९ हजार ४७९ जणांनी भरती प्रक्रियेत सहभागी होत मैदानी व शारीरिक चाचणी झाली होती. मैदानी शारीरिक चाचणी मध्ये ३५ हजार ९५६ उमेदवार पात्र ठरले होते. २ एप्रिलला पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती.लेखी परीक्षेसाठी एकूण १२ हजार १२७ पात्र उमेदवार होते.मात्र भरतीसाठी ८ हजार ८५८ पुरुषांपैकी ७ हजार ७२१ लेखी परीक्षेसाठी हजर होते तर महिला लेखी परीक्षेसाठी ३ हजार २६९ पैकी २ हजार २७८ हजर होत्या. शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा पार करत ९९६ जण भरती झाले होते. यामध्ये ९८६  पोलीस शिपाई तर १० वाहन चालक आहेत. मुला- मुलींची शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना पोलीस प्रशिक्षण करता पाठवण्यात आले होते व आता त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असून, त्यानुसार आता आयुक्तालयात नवीन कर्मचारी प्राप्त झाल्याने आयुक्तलयात भासणारी कर्मचाऱ्यांची कमतरता काही प्रमाणात भरून निघाली आहे. याच बरोबर पोलीस आयुक्तलयात वाहनांची संख्या कमी असल्याने ७० वाहनांची मागणी करण्यात आली होती. ती देखील मंजूर झाली असून ७० वाहने पोलीस ताफ्यात दाखल होणार आहेत त्यामुळे पोलिसांना बिट मार्शल अथवा गुन्हा झालेल्या ठिकाणी वेळेवर पोहचण्यास मदत होणार असल्याची माहिती परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -