घर पालघर आता अजून एका ग्रामपंचायतीत धर्मांतर केल्यास आदिवासी योजनांचा लाभ न देण्याचा निर्णय

आता अजून एका ग्रामपंचायतीत धर्मांतर केल्यास आदिवासी योजनांचा लाभ न देण्याचा निर्णय

Subscribe

धर्मांतरामुळे आदिवासी समाजातच तेढ निर्माण करण्याचे काम करत होत असल्याने सभेत गावकर्‍यांनी यावर निर्णय घेण्याची मागणी केली.

वाडाः विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत इतर धर्म स्विकारणार्‍यांना आदिवासी विकास योजनांचा लाभ दिला जाणार नाही, असा ठराव संमत झाल्यानंतर शेजारच्या वाडा तालुक्यातील पिक ग्रामपंचायतीच्या आमसभेतही असाच ठराव संमत करण्यात आला आहे. त्यामुळ पालघर जिल्ह्यात धर्मांतरावरून नवा वाद उफाळून येण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. पीक ग्रामपंचायतच्या ग्रामसेभेतआदिवासी समाजातील काही लोक इतर धर्म स्वीकारत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. धर्मांतर केल्यानंतर संस्कृती, परंपरा जोपासणे नाकारू लागल्याने त्याचा र्‍हास होऊ होण्याची भितीही व्यक्त करण्यात आली. धर्मांतरामुळे आदिवासी समाजातच तेढ निर्माण करण्याचे काम करत होत असल्याने सभेत गावकर्‍यांनी यावर निर्णय घेण्याची मागणी केली.

त्यावर धर्मांतर करणार्‍या आदिवासी लोकांना आदिवासी विकास योजनेचा लाभ घेता येणार नाही, असा एकमुखी ठराव संमत करण्यात आला. तसेच बेकायदेशीररित्या जी लोक इतर धर्माची प्रार्थना शिबिरे चालवित आहेत अशा लोकांना ग्रामपंचायतीकडून रीतसर नोटीस पाठवून कायदेशीर कारवाई करावी, असाही ठराव संमत करण्यात आला. पीक ग्रामपंचायत हद्दीतील जे नागरिक इतर धर्म स्वीकारतील त्यांना यापुढे कोणत्याही आदिवासी विकास योजनेचा लाभ घेता येणार नाही. यापुढे अशा लोकांनी जातीचा दाखला किंवा इतर कागदपत्रे ही त्या धर्माची घ्यावीत, असे ठरावात नमूद करण्यात आल्याची माहिती सरपंच रविंद्र जोगवाला यांनी दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -