घरपालघरशेणाने सारवलेली जमीन आणि रक्तांच्या डागांमुळे आरोपी सापडला

शेणाने सारवलेली जमीन आणि रक्तांच्या डागांमुळे आरोपी सापडला

Subscribe

विवारी रात्री 1.22वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता.आता पोलिसांसमोर गुन्हेगाराला शोधण्याचे मोठे आव्हान होते.पोलीस कामाला लागले.

डहाणू: पैसा आणि जमीन याद्वारे अनेक युद्धे झालेली आहेत.कधी कधी यासाठी रक्ताच्या नात्यांचा देखील क्रूरपणे अंत केला जातो.याचाच प्रत्यय डहाणूतील सोमटा-घाटाळपाडा येथे आला. सोमटा- घाटाळपाडा येथे वन विभागाच्या जागेत रस्त्यापासून अंदाजे 15 फूट अंतरावर एक इसम मृताअवस्थेत आढळून आला. या अज्ञात इसमाच्या मानेवर आरोपीने धारदार हत्यारांनी खूपसून व गंभीर दुखापत करून त्याचा खून केला होता.याबाबत येथील काशीराम कृष्णा डवला (सोमटा गाव पोलीस पाटील) यांनी कासा पोलिसांना माहिती दिली.मयताचे नाव कृष्णा रामा डोंगरकर ( वय 65 ) असे समोर आले.याबाबत कासा पोलीस ठाण्यामध्ये रविवारी रात्री 1.22वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता.आता पोलिसांसमोर गुन्हेगाराला शोधण्याचे मोठे आव्हान होते.पोलीस कामाला लागले.

पोलिसांनी गोपनीय माहिती जमवायला सुरूवात केली.मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना मयताचा मुलगा रामदास डोंगरकर याची चौकशी सुरू केली.चौकशी करताना तो सतत घटनेचा क्रम बदलून सांगत होता.तसेच घाबरून पाणी मागत होता.तो इतका घाबरला होता की,त्याच्या अंगाला घाम फुटला होता.त्यामुळे सदर क्रूर गुन्हा रामदासनेच केला असावा असा पोलिसांना दाट संशय आला. पोलिसांना त्याच्या घराची पाहणी केली असता, घरी ताज्या शेणाने सारवलेली जमीन आढळली. त्या जागेत ठिकठिकाणी रक्त पडल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याची उलटतपासणी सुरू केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. या प्रकरणाचा अधिक तपास कासा पोलीस अधिकारी नामदेव बंडगर आणि पोलीस अधिकारी संदीप नागरे हे करीत आहेत.

- Advertisement -

म्हणून वडिलांची क्रूरपणे हत्या केली

मयत यांचा चुलत भाऊ जयराम डोंगरकर याच्याबरोबर मयत कृष्णा रामा डोंगरकर यांच्यात जमिनीचा वाद असून हे प्रकरण सध्या प्रांत कार्यालय पालघर येथे चालू आहे. सदर आरोपीचे मयत वडील कृष्णा हे आपल्याला जमीन मिळणार हे गावभर सांगत असत,असे आरोपीने सांगितले. या गोष्टीचा राग आरोपी रामदास आणि त्याचा चुलत भाऊ विलास डोंगरकर यांना होता. त्यामुळे अखेर रामदास डोंगरकर याने घरात झोपलेल्या वडिलांवर लोखंडी विळ्याने मानेवर डाव्या बाजूला गंभीर वार करीत आपल्या वडिलांची हत्या केली. सदरची घटना कोणाला माहिती पडू नये या भीतीपोटी त्याने प्रेत विलास डोंगरकर याच्या मदतीने घरातून उचलून नेऊन पुरावा नष्ट केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -