घरक्राइमSBI Bank Fraud : ऑनलाइन बेटिंगच्या नादात मॅनेजरने लुटली स्वतःचीच बँक; तीन...

SBI Bank Fraud : ऑनलाइन बेटिंगच्या नादात मॅनेजरने लुटली स्वतःचीच बँक; तीन कोटींच्या सोन्यावर डल्ला

Subscribe

मुंबई : ऑनलाइन बेटिंगच्या नादात चोरीच्या घटना घडताना आपण अनेकदा पाहिल्या आहेत. मात्र आता भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) मॅनेजरने स्वत:च्याच बँकेतील तीन कोटी रुपयांच्या सोने लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन बेटिंग खेळण्याचा नाद या बँक मॅनेजरला एवढा लागला त्याने बँकेचे लॉकर फोडून त्यातील सोने चोरी केले आणि ते विकले. भांडुप पश्चिममध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलुंड शाखेच्या पर्सनल ब्रांचमध्ये काम करणाऱ्या सर्व्हिस मॅनेजरसह एकाला अटक केली आहे. (SBI Bank Fraud Manager robbed his own bank in the name of online betting Dalla on gold worth three crores)

हेही वाचा – Pratibha Dhanorkar : पक्षांतर्गत विरोधामुळेच माझ्या नवऱ्याचा जीव गेला; आमच्या पक्षात भाजपाच्या…

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड-नाहूर येथील रूनवाल ग्रीन या ठिकाणी असलेल्या एसबीआयच्या शाखेत अमित कुमरा हे प्रशासक म्हणून काम करतात, तर आरोपी मनोज म्हस्के हा मॅनेजर म्हणून काम करतो. 27 फेब्रुवारी रोजी मनोज म्हस्के रजेवर असताना प्रशासक अमित कुमार यांच्याकडे लॉकरची जबाबदारी होती. अमित कुमार त्यादिवशी लॉकरमध्ये रोख रक्कम आणि दागिने जमा करण्यासाठी गेले असता त्यांना सोन्याच्या दागिन्यांची अनेक पाकिटे गायब असल्याचे निदर्शनास आले. बँकेतील कागदपत्रे तपासली असता त्यांच्या शाखेने 63 ग्राहकांचे सोनं तारण ठेवून कर्ज दिले होते. मात्र लॉकरमध्ये असलेल्या 63 सोन्याच्या पाकिटांपैकी 59 पाकिटे गहाळ झाली होती आणि फक्त 4 पाकिटे शिल्लक होती.

लॉकरला दोन चाव्या असून दोन्ही चाव्या वापरूनच लॉकर उघडता येणे शक्य होते. एक चावी सर्व्हिस मॅनेजरकडे, तर दुसरी शाखेत कॅश इनचार्ज म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडे असते. 59 पाकिटे गहाळ असल्यामुळे अमित कुमार यांनी ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेत सुट्टीवर असलेल्या सर्व्हिस मॅनेजर मनोज म्हस्के यांना तातडीने बँकत बोलावून घेतले आमि गहाळ झालेल्या सोन्याच्या पाकिटाबाबत विचारले. यावेळी मनोज म्हस्के याने सोन गायब केल्याची कबुली देत, गायब सोन्यापैकी काही सोने दुसरीकडे गहाण ठेवले तर काही सोने विकल्याची कबुली दिली. तसेच गायब केलेले सोने लवकरच परतो करतो, असे म्हणत त्याने बँकेकडे वेळ मागून घेतला. पण बँकेने त्याला कुठलाही वेळ न देता अमित कुमार यांनी भांडुप पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली.

- Advertisement -

हेही वाचा – T20 World Cup : मोहम्मद शमी बाहेर तर ऋषभ पंत खेळण्याची शक्यता; जय शहा काय म्हणाले…

पोलिसांनी याप्रकरणी मनोज म्हस्के याची चौकशी केली असता फरीद शेख असे दुसऱ्या आरोपीचे नाव समोर आले. मनोज म्हस्के हा बँकेतून चोरी करत होता, तर फरीद शेख मनोजला सोनं विकण्यास मदत करत होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसानी मनोज म्हस्के आणि त्याचा साथीदार फरीद शेख यांना भादंवि कलम 409 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मनोज म्हस्के याला ऑनलाइन सट्टा खेळण्याची सवय आहे. त्यामुळे त्याने सोने चोरी करून दुसऱ्या ठिकाणी गहाण ठेवले आहे. त्यामुळे सोनं कुठे गहाण ठेवले आहे, यासंदर्भात तपास करत असल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -