घरपालघरमहापालिका कार्यक्रमांमध्ये शिष्टाचार पाळा, आयुक्तांपुढे विरोधकांचा संताप

महापालिका कार्यक्रमांमध्ये शिष्टाचार पाळा, आयुक्तांपुढे विरोधकांचा संताप

Subscribe

 वसई: स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमादरम्यान विशिष्ठ पक्षाशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांचा शालश्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन वसई विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मात्र हा सत्कार करताना सामाजिक कार्यात योगदान दिलेल्या शहरातील अन्य प्रतिष्ठित व्यक्ती आणि संस्था यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यापुढे नाराजी व्यक्त केली महापालिकेच्या कार्यक्रमांमध्ये शिष्टाचाराचे पालन व्हावेसर्वपक्षीय लोकांना व जनतेला सगळ्यांना कार्यक्रमात सामावून घ्यावेमहापालिकेकडून राजकारण होऊ नये याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना,भाजप,काँग्रेसप्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली होती.

15 ऑगस्ट रोजी सकाळीमहापालिका मुख्यालय मैदानात ध्वजारोहण व ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान कोविड संक्रमण काळात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या व्यक्ती व संस्थांचा महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या हस्ते शालश्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मात्र या सत्कारमूर्ती संस्था व व्यक्ती सत्ताधारी पक्षाशी संबंधित होत्या. या संस्था व व्यक्तींना झुकते माप देताना महापालिकेला मात्र शहरातील अन्य संस्था व प्रतिष्ठित व्यक्तींचा विसर पडल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात या नेत्यांनी एकत्रित येऊन आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेतली व त्यांना याबाबत विचारणा केली. त्यावर आयुक्तांनी झाल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढील कार्यक्रमांत आपल्या सूचनेचा विचार केला जाईलअसे आश्वासन सर्वपक्षीय नेत्यांना दिले आहेअशी माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते सुदेश चौधरी यांनी दिली. शिवसेना शिंदे गटाचे सुदेश चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडाशिवसेनेचे जिल्हाप्रमुख पंकज देशमुखप्रहारचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधवदुशांत पाटीलभाजपाचे माजी नगरसेवक किरण भोईरविरार शिवसेना शहरप्रमुख उदय जाधवकिरण शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी हजर होते.

- Advertisement -

याआधीही महापालिकेतील विरोधी पक्षांसोबत  दुजाभाव केल्याने आयुक्त अनिलकुमार पवार टीकेचे धनी झालेले आहेत. वसई-विरार महापालिकाक्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा परिषद कार्यालय पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने 25 जुलै रोजी आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धा 2022`चे  निमंत्रण विरोधी पक्षातील एकाही नगरसेवकाला पालिका आयुक्तांनी दिलेले नव्हते. त्यावेळीही शिवसेना-भाजप नगरसेवकांच्या संतापाचा कडेलोट झाला होता. मागील आठवड्यात घनकचरासांडपाणी पुनप्रर्किया व अन्य विकासकामांबाबत केंद्रीय शहरी विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यासोबत दिल्ली येथे झालेल्या शासकीय बैठकीत एका खासगी व्यक्तीचा समावेश करून घेतला होता. या बैठकीची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर आयुक्तांवर वसई-विरारकरांनी टीकेचा भडिमार केला होता. तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ऑगस्ट रोजी आयोजित अग्निशमन दलाच्या बाईक रॅलीत स्थानिक पक्षाचा झेंडा दाखवल्यानेही आयुक्त विरोधी पक्षांच्या रडारवर आले होते.

प्रतिक्रिया

- Advertisement -

 कोविड काळात शहरातील अनेक संस्था व विविध राजकीय पक्षांनीसामाजिक कार्यकर्त्यांनीपदाधिकाऱ्यांनीसंघटनांनीमंडळांनी फारच मोलाची कामगिरी केलेली आहे. यासर्वांचाही यथोचित सत्कार होणे अपेक्षित होते. परंतु महापालिकेने या सर्वांना दुर्लक्षित करून केवळ आणि केवळ आमदार कुटुंबियांच्या सत्कारात धन्यता मानली. विशेष म्हणजे दोन्ही आमदार उपस्थित असताना किमान त्यांनी तरी आपल्या मतदारसंघातील इतर संस्थांचासंघटनांचा सत्कार होत नाही. त्यांना डावलले जाते म्हणून त्याच व्यासपीठावर नेहमीच्या शैलीत समाचार घ्यायला हवा होता. पण, त्यांनाही शहरवासियांचा त्यावेळी सोयीस्कर विसर पडला होता. त्याचाच निषेध करण्यासाठी आयुक्तांची आम्ही भेट घेतली होती.

— सुदेश चौधरीशिवसेना नेते (शिंदे गट) 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -