घरपालघरअखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे निकृष्ट रस्त्याविरोधात उपोषण

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे निकृष्ट रस्त्याविरोधात उपोषण

Subscribe

तब्बल सहा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या दुर्वेस-सावरे रस्ता अवघ्या सहा महिन्यातच उखडून खड्डेमय झाला आहे.

तब्बल सहा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या दुर्वेस-सावरे रस्ता अवघ्या सहा महिन्यातच उखडून खड्डेमय झाला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने उपोषण सुरु केल्यानंतर त्याची दखल घेत रस्ता दुरुस्ती लवकरच केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सहा कोटी रुपये खर्च करून १५ किलोमीटर अंतराचा दुर्वेस सावरे रस्ता तयार करण्यात आला होता. कंत्राटदाराने तयार केलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याने सहा महिन्यातच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला ग्रामस्थांच्या मागणीनंतर थातुरमातुर दुरुस्तीचे काम करण्यात आले होते.

कोरोना काळ सुरू झाल्यापासून दुर्वेस सावरे रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रस्त्यावर मोठ्या संख्येने खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सावरे, एम्बुर,सावरे आणि पाचूधारा या आदिवासीबहुल दुर्गम भागातील ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेमार्फत वर्षभरापासून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाच्या उपअभियंता कार्यालयात पत्रव्यवहार आणि उपअभियंत्यांची भेट घेत दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. परंतु ग्रामसडक विभागाकडून आदिवासी विकास परिषदेकडून केल्या जाणाऱ्या दुरुस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष रामदास हरवटे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. त्याची दखल घेत उपअभियंता तुषार भदाणे व पवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट चर्चा केली.

- Advertisement -

कार्यकारी अभियंता कार्यालयात उपोषणकर्त्यांना दुर्वेस सावरे रस्त्याची सध्याची परिस्थिती, रस्ता दुरुस्तीचा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून रस्ता दुरूस्त करण्याचे नियोजनाबाबतची माहिती देण्यात आली. ठेकेदाराकडून दुर्वेस सावरे स्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करताना उपोषणकर्त्यांना माहिती देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यास विनंती करण्यात आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

हेही वाचा –

Space Station भारतावर पाडायचे की चीनवर?; रशियन स्पेस एजन्सीची थेट अमेरिकेला धमकी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -