घरपालघरअंगणवाडी कर्मचारी संघाचा जव्हार पंचायत समितीवर मोर्चा

अंगणवाडी कर्मचारी संघाचा जव्हार पंचायत समितीवर मोर्चा

Subscribe

गाव पाड्यातील प्रत्येक घटनेत अंगणवाडी ताई महत्त्वाच्या भूमिकेत असते, तर शासन स्तरावरची बहुतेक आकडेवारी यांच्यावरच अवलंबून असते.

जव्हार : महाराष्ट्क अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे जव्हार पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला. महिला आणि बालविकास विभागांतर्गत एबाविसे योजनेत काम करणार्‍या ग्रॅच्युईटी, दरमहा पेन्शन , वेतनश्रेणी व लाभार्थ्यांच्या आहारात दुपटीने वाढ करण्याकरिता हे कर्मचारी मागील डिसेंबरपासून बेमुदत उपोषणावर आहेत. शासनस्तरावर या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याऐवजी प्रशासन कर्मचार्‍यांना नोटीसा देण्यात आपली धन्यता मानत आहे, हे नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरोधात आहे असे कर्मचारी संघाचे म्हणणे आहे. जव्हार तालुक्यात एकूण अंगणवाडी केंद्राची संख्या 344 असून, पहिल्या आणि दुसर्‍या प्रकल्पात दहा सर्कल आहेत. अंगणवाडीताईंना पूरक पोषण आहार, दरमहा स्तनदा माता आणि बालकांचे लसीकरण, जन्म आणी मृत्यू नोंद ठेवणे, शासनाचे सर्व प्रकारचे सर्वेक्षण करणे आदी कामे करत बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याची जबाबदारी असते. अंगणवाडीताईंना आठवड्यातून दोनदा सर्कलनिहाय बैठकीला हजर राहावे लागते. अंगणवाडी केंद्रात सततच्या बैठका, ऑनलाइन कामे यात अंगणवाडीताई व्यस्त असते. गाव पाड्यातील प्रत्येक घटनेत अंगणवाडी ताई महत्त्वाच्या भूमिकेत असते, तर शासन स्तरावरची बहुतेक आकडेवारी यांच्यावरच अवलंबून असते.

परंतु अंगणवाडीताईंना गावातील विविध प्रकारचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आणि त्यात सातत्याने बैठकीला उपस्थित राहावे लागते, शिवाय ऑनलाईन कामाचा ताण देखील अधिक आहे. त्यात मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्यात खंड पडू नये यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तुटपुंज्या मानधनावर सेवा देणार्‍या अंगणवाडी सेविकांना तालुक्याच्या अन् इतरत्र बैठकीला जावे लागत असल्याने अर्धा पगार यातच खर्च होत आहे. ही सगळी कामे करत असतांना स्थानिक पातळीवरील आव्हाने वेगळीच असतात. यात अंगणवाडी कर्मचार्‍यांचे थकीत टी ए डी ए ,नवीन मोबाईल ,नवीन मदतनीसाचे थकित मानधन, इंधन बिलाची रक्कम सेवानिवृत्त महिलांना एकरकमी लाभ या प्रमुख मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नसल्याचे आंदोलित महिलांनी सांगितले.
या आंदोलनास विविध संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. यातच भूमिपुत्र संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आपले समर्थन पत्र कर्मचारी संघास दिले आहे. याबाबत भूमीपुत्र संघटना तालुका अध्यक्ष तंजिम शेख, उपाध्यक्ष मुजम्मिल पटेल यांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला आणि प्रशासन व आंदोलनकर्ते याच्या संभाषनात आपल्या मध्यस्थीची भूमिका निभावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -