घरठाणे'नजीब मुल्ला ट्रॉफी २०२४' क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

‘नजीब मुल्ला ट्रॉफी २०२४’ क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांची माहिती, क्रिकेट स्पर्धेमध्ये ठाणे, मुंबई तसेच देशभरातील नामांकित क्रिकेट संघ सहभागी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार भेट देणार 

शनिवारी, १३ जानेवारीपासून ‘नजीब मुल्ला ट्रॉफी २०२४’ क्रिकेट स्पर्धा सुरू होणार असून या क्रिकेट स्पर्धेमध्ये ठाणे, मुंबई तसेच देशभरातील नामांकित क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डाॅ श्रीकांत शिंदे भेट देणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक विभाग निरिक्षक नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष संदेश पाटील, परिवहन सदस्य मोहसीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

शनिवारी, १३ जानेवारी ते रविवारी २१ जानेवारी, २०२४ या कालावधीमध्ये दादोजी कोंडदेव स्टेडीयम, फायर ब्रिगेड रोड, जांभळी नाका, ठाणे (पश्चिम) येथे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या वतीने “नजीब मुल्ला ट्रॉफी २०२४” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेमध्ये ठाणे, मुंबई तसेच संपूर्ण देशभरातील नामांकित क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

या स्पर्धेमध्ये राबोडी विभाग, ठाणे परिसरातील ग्रामीण भागातील ‘एक गाव एक संघ’ या संकल्पनेनुसार १६ संघ, ठाणे विभागामधील १५ संघ, कळवा-मुंब्रा परिसरातील ८ संघ, गुजरात, मुंबई, पुणे, पालघर, राजकोट, दिल्ली येथील ऑल इंडिया ओपन असे १२ संघ तसेच ठाणे शहरातील पत्रकारांचा संघ, ठाणे महापालिकेतील अधिकारी-कर्मचारीवर्ग यांचा संघ, ठाणे शहरातील पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारीवर्ग यांचा संघ, ठाणे शहरातील डॉक्टर्स यांचा संघ, ठाणे शहरातील वकिलांचा संघ, ठाणे शहरातील महावितरणमधील अधिकारी-कर्मचारी वर्ग, राष्ट्रवादी काँग्रेसचा संघ, मराठी सिनेकलाकार यांचा संघ आणि टीम नजीब मुल्ला म्हणून सहकारी संघ देखिल सहभागी होणार आहेत. शनिवारी, १३ जानेवारी ते मंगळवारी, १६ जानेवारी या कालावधीमध्ये ठाणे जिल्ह्यातील संघांचे सामने, बुधवारी, १७ जानेवारी रोजी प्रदर्शनीय सामने ज्यामध्ये ठाणे विरुद्ध रायगड आणि टेनिस क्षेत्रातील नामांकित महिला क्रिकेट संघांचे सामने हे मुख्य आकर्षण असणार आहे. गुरुवारी, १८ जानेवारी ते शनिवारी, २० जानेवारी या कालावधीत ऑल इंडिया ओपन संघाचे सामने आणि रविवारी, २१ जानेवारी रोजी अंतिम सामने खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित  पवार, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे तसेच इतर प्रमुख मान्यवर भेट देणार आहेत, असेही प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -