घरपालघरमहापालिका कर्मचार्‍यांना दिवाळी सानुग्रह अनुदान देण्यास मंजुरी

महापालिका कर्मचार्‍यांना दिवाळी सानुग्रह अनुदान देण्यास मंजुरी

Subscribe

या वर्षीच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात दिवाळी सानुग्रह अनुदानासाठी 4 कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

भाईंदर :- मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मीरा- भाईंदर महापालिका आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचारी यांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान मंजूर करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे सानुग्रह अनुदानात कोणतीही वाढ न करता महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना २०२३ – २४ या वर्षासाठी मागील वर्षी दिलेल्या सानुग्रह अनुदानाप्रमाणेच सानुग्रह अनुदान देण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. या वर्षीच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात दिवाळी सानुग्रह अनुदानासाठी 4 कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

त्यातील सुमारे 4 कोटी २५ लाखांचे सानुग्रह अनुदान यावर्षी देण्यात येणार आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी, तसेच वर्ग एक ते वर्ग चार संवर्गातील १,३६४ कर्मचार्‍यांना २४,७१७ रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले. याव्यतिरिक्त संगणक चालकांना १९,०३२ रुपये, बालवाडी शिक्षिकांना १०,८७६ रुपये, महापालिकेच्या शिक्षकांना २४,७१७ रुपये, सर्व शिक्षा अभियानातील कर्मचार्‍यांना १९,०३२ रुपये, आशा सेविका ३,८८४ रुपये, वैद्यकीय आरोग्य विभागातील मानधनावरील कर्मचार्‍यांना १५,६३३ रुपये, क्षयरोग कर्मचार्‍यांना १४२१२ रुपये, राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान, स्थानिक संस्था कर विभागातील ठोक मानधनावरील कार्यरत असलेले ऑडीट लिपीक, पी एम. ए. वाय. योजनेतील कर्मचारी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत काळजी वाहक कर्मचारी व कुस्ती मार्गदर्शक, क्षयरोग कर्मचारी व सेवानिवृत्त अधिकारी यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -