घरपालघरशहरात कचरा संकलनाचा बारकोड पॅटर्न यशस्वी होतोय

शहरात कचरा संकलनाचा बारकोड पॅटर्न यशस्वी होतोय

Subscribe

त्यामुळे या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी सांगितले आहे.

भाईंदर :- मीरा -भाईंदर महापालिकेने शहरात कचर्‍याचे वर्गीकरण करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर बारकोड पद्धती राबवण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने ’बारकोड’ पद्धती वापरण्याचा घेतलेला निर्णय यशस्वी होताना दिसत आहे. सध्या शहरातील दोनशेपेक्षा जास्त इमारती या बारकोड पद्धतीमध्ये सहभागी झाल्या आहेत. दैनंदिन कचर्‍याचे व्यवस्थितरित्या संकलन होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी सांगितले आहे.

मीरा -भाईंदर शहारात दैनंदिन कचरा ५६० टनापेक्षा जास्त तयार होत आहे. या कचर्‍यावर दररोज प्रक्रिया करण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी सुका कचरा व ओला कचरा वर्गीकरण करणे आवश्यक आहे. कचर्‍याचे वर्गीकरण करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने बारकोड पद्धती राबवण्याचा निर्णय घेतला. शहरात दैनंदिन गोळा होणार्‍या ओला आणि सुक्या कचर्‍याचे वर्गीकरण व्हावे व नागरिकांना त्याची सवय लागावी यासाठी महापालिकेने ’रिसायकलिंग’ या संस्थेने तयार केलेल्या ’बारकोड’ कार्य प्रणालीचा प्रायोगिक तत्त्वावर अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

अशी आहे व्यवस्था

त्यानुसार प्रभाग क्रमांक १३ मध्ये सहा महिन्यांपूर्वी नागरिकांच्या घरात कचरा संकलनासाठी ’बारकोड’ लावले होते. कचरा घेण्यासाठी येणारा सफाई कर्मचारी कचर्‍याचे वर्गीकरण केलेले आहे की नाही हे पाहून त्यानंतर ’बारकोड’ स्कॅन करून आपला शेरा देत होता. त्यामुळे कचर्‍याचे वर्गीकरण न करणार्‍याची माहिती महापालिकेला मिळते. त्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणे महापालिकेला सोपे जाते. नागरिकांनीही या उपक्रमाला सहकार्य करत कचर्‍याचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या बारकोड कार्यप्रणालीला २०० पेक्षा जास्त इमारतींमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी होत असून यामुळे ९९ टक्के कचर्‍याचे वर्गीकरण करणे शक्य झाले असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे हा उपक्रम शहरात इतर प्रभागांत देखील राबवण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -