घरपालघरBeef Ban: तीन गोमांस तस्करांवर कारवाई

Beef Ban: तीन गोमांस तस्करांवर कारवाई

Subscribe

त्यावेळी १५०० किलो गोमांस , एक बोलोरो पिकअप असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

भाईंदर :- काशीगाव पोलिसांनी २१ एप्रिल रोजी गोमांसाची तस्करी करणार्‍या दोन फरार आरोपींना २४ एप्रिल रोजी अटक केली होती. त्यांची तीन दिवसानंतर जामिनीवर मुक्तता करण्यात आली आहे. तर त्यात आणखी एका आरोपीला २७ एप्रिल रोजी अटक करण्यात यश आले असून त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काशीमिरा परिसरातील काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत विनापरवानगी बेकायदेशीर रित्या गोमांसासाठी जनावरांची कत्तल करून ते त्याची वाहतूक करताना आढळले होते. त्यावेळी १५०० किलो गोमांस , एक बोलोरो पिकअप असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

त्यात आता पोलिसांनी तांत्रिक सीसीटीव्ही फुटेज तपास करून बोलोरो वाहन चालक आरोपी रमेश आनंद गोसावी आणि अल्ताफ आयुब अत्तार(दोघेही रा. चौक मंडई, नाशिक) यांना अटक केली होती. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर त्यांची जामिनीवर मुक्तता करण्यात आली. त्यानंतर लगेच पोलिसांनी तिसरा आरोपी कासम अली कुरेशी याला २८ एप्रिल रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार साठे हे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -