घरपालघरजव्हारमध्ये परप्रांतियांची दादागिरी, ग्रामसेवकास बेदम मारहाण

जव्हारमध्ये परप्रांतियांची दादागिरी, ग्रामसेवकास बेदम मारहाण

Subscribe

त्याबाबत कारवाई व्हावी यासाठी सोमवारपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे. कारवाई न केल्यास आदिवासी संघर्ष समिती हे हात गाडे, टपर्‍या हटवेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जव्हार: जव्हार शहरात ठिक ठिकाणी परप्रांतीय नागरिक छोटा मोठा व्यवसाय करून कुटुंबाची गुजराण करीत आहेत. दिवसागणिक हे हातगाड्या फूटपाथ काबीज करण्याचा प्रकार दिसून आला आहे. परंतु यांच्यातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी शहरातील शांततेला बाधा आणली आहे. बुधवारी दुपारी एका आदिवासी ग्रामसेवकाने काही वस्तू खरेदीसाठी त्यांची दुचाकी एस टी स्टँड रोडवर परप्रांतीय फुल विक्रेता याच्या गाडीसमोर लावली असता, त्यांच्यात शाब्दिक चकमक होऊन फुल विक्रेत्याने ग्रामसेवकाला खाली पाडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी संबंधित फुल विक्रेत्याला जव्हार पोलिसांनी ताब्यात घेवून ३२३,५०४ व ५०६ कलमे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
वाहतूक कोंडीतून असे प्रकार घडत असून यातून मार्ग काढण्यासाठी तसेच शहरातील सुव्यवस्थेसाठी बस स्टँड हद्दीतील रस्ता लगत अतिक्रमित असलेले हात गाडे, टपर्‍या हटविण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना अतिक्रमण हटविण्याबाबत आदिवासी संघर्ष समितीने निवेदन दिले आहे. त्याबाबत कारवाई व्हावी यासाठी सोमवारपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे. कारवाई न केल्यास आदिवासी संघर्ष समिती हे हात गाडे, टपर्‍या हटवेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आदिवासी संघर्ष समितीकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार, एस टी स्टँड परिसरातील अतिक्रमणाबाबत नगर परिषदेकडून वाहन उद्घोषणाद्वारे जनजागृती केली जात आहे.

- Advertisement -

– मानिनी कांबळे,मुख्याधिकारी, जव्हार नगर परिषद

एस टी स्टँड परिसरात नियमित पोलीस गस्त ठेवण्यात येत असते. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या परिसरात पोलीस गस्तीत अधिक वाढ करण्यात येईल.

- Advertisement -

– संजयकुमार ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक,जव्हार पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -