घरपालघरदेवा ,खड्ड्यांचे विघ्न कधी जाणार?

देवा ,खड्ड्यांचे विघ्न कधी जाणार?

Subscribe

या कंपनीने या महामार्गाच्या चौपदरी करणाच्या पायाभरणीचे काम येथील काही स्थानिक ठेकेदार, काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या पोट ठेकेदारांना दिले.

वाडा:  वर्षांपूर्वी नव्याने चौपदरीकरण करण्यात आलेल्या भिवंडी-वाडा-मनोर या 64 किलोमीटर लांबीच्या राज्य महामार्गावर पहिल्या वर्षापासून (गेल्या 13 वर्षांपासून) सुरु झालेली खड्ड्यांची मालिका आजपर्यंत तशीच सुरु आहे. या मार्गावरील खड्डे भरण्यासाठी आजवर 60 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आलेला आहे. येथील खड्ड्यांविरोधात अनेक आंदोलने झालेली आहेत. पण हा मार्ग आजवर खड्डेमुक्त झालेला नाही. शासन, प्रशासन यांना सांगून येथील जनता हैराण झाली आहे.अखेर आता या राज्य महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न दुर कर रे विघ्नहर्ता!! अशी आर्त आरोळी प्रवाशांनी गणरायापुढे मारली. या महामार्गावर गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत 55 कोटी रुपयांचा खर्च खड्डे भरण्यासाठी करुनही या महामार्गाची दुरवस्था कायम आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेच्या विरोधात राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी, संघर्ष समित्यांनी आंदोलने केली असली तरीही आजवर या आंदोलनाची राज्यकर्त्यांनी वा सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने दखल घेतलेली दिसून येत नाही. बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर भिवंडी-वाडा-मनोर या 64 किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचे काम 11 ऑक्टोबर 2010 मध्ये सुप्रीम इन्फ्रास्टक्चर प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने या महामार्गाच्या चौपदरी करणाच्या पायाभरणीचे काम येथील काही स्थानिक ठेकेदार, काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या पोट ठेकेदारांना दिले.

महामार्गाच्या कामाचा आवश्यक अनुभव नसलेल्या या पोट ठेकेदारांनी निव्वळ पैसे कमावण्यासाठी पायाभरणीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले. यामुळेच या रस्त्यावर प्रत्येक पावसाळ्यात हजारोंच्या संख्येने खड्डे पडत आहेत. या रस्त्यावरील हजारोंच्या संख्येने असलेल्या खड्ड्यांमुळे नेहमीच अपघात होत असून गेल्या पाच वर्षांत शंभर पेक्षा अधिक मोठे अपघात होऊन 70 हून अधिक नागरिकांचे बळी गेले आहेत. शासनाला अजून किती बळी हवे आहेत, असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.

- Advertisement -

चौकट

तर 40 किलोमीटरचा फेरा

- Advertisement -

या महामार्गावरील वाडा-मनोर दरम्यान पिंजाळी नदीवर पाली व देहेर्जे नदीवर करळगांव येथे पूल आहेत. हे दोन्ही पूल 80 ते 85 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले आहेत. या दोन्ही पुलांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. या पुलावरील वाहतूक बंद पडली तर 40 ते 45 किलोमीटरचा फेरा मारल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्यायी रस्ता नाही. या महामार्गावर पिंजाळी नदीवर पाली येथे असलेल्या पुला व्यतिरिक्त या नदीवर 20 किलोमीटर अंतरामध्ये कुठेही दुसरा पर्यायी पूल नाही. या जुन्या पुला शेजारी नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाचे बांधकाम जागेच्या वादातून गेल्या दहा वर्षांपासून बंद पडले आहे. देहेर्जे नदीवरील करळगांव येथील पुलाची हीच परिस्थिती आहे.

कोट
1) वाडा-मनोर महामार्गावर असलेल्या जुन्या व नादुरुस्त स्थितीतील या दोन्ही पुलांजवळ तातडीने पर्यायी पुलांचे काम हाती घ्यावे. दुर्दैवी घटना घडल्यास या महामार्गावरुन मुंबई व गुजरात कडे जाणार्‍या वाहनांना 40 किलोमीटर अंतराचा अधिकचा फेरा बसेल.

– नरेश आकरे – सामाजिक कार्यकर्ता वाडा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -