घरपालघरDahanu Chiku: डहाणूच्या चिकूच्या मागणीत घट,भाव घसरले

Dahanu Chiku: डहाणूच्या चिकूच्या मागणीत घट,भाव घसरले

Subscribe

त्यात चार रुपये प्रतिकिलो तोडण्याची मजुरी वजा करता शेतकर्‍यांच्या हाती चार ते पाच रुपये आले. त्यामुळे बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले.

डहाणू:घोलवडच्या प्रसिद्ध चिकू फळाला सध्या बाजारपेठेत मागणी कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून होलसेल बाजारपेठेत देखील चिकू फळाचे बाजार भाव गडगडल्याने येथील बागायतदारांवर मोठे संकट कोसळले असून ते आर्थिक अडचणीत सापडले आहे. डहाणू घोलवडचे प्रसिद्ध चिकू असून या चिकूला वर्षभर मुंबई, दिल्ली, राजस्थान, तसेच उत्तर भारतात मोठी मागणी असते. दरवर्षी साधारणपणे डिसेंबर पासून चिकूच्या हंगामाला सुरुवात होते. परंतु गेल्या वर्षी चक्रीवादळाचा फटका या परिसरातील बागायतींना बसल्याने चिकूचा हंगाम डिसेंबर ऐवजी फेब्रुवारीत सुरू झाला. चिकू फळाची आवक उशिरा सुरू झाल्याने तसेच बाजारपेठेत आंबे, मोसंबी, संत्रे, द्राक्ष, पेरू, इत्यादी फळांचे हंगाम सुरू असल्याने चिकूला मागणी कमी झाली. विशेष म्हणजे अनेक सणाच्या दिवसात त्यात मुस्लिमांच्या रमजान सणामध्ये फळांचे बाजार भाव वाढतील अशी आशा शेतकर्‍यांना होती. मात्र या काळात ही बाजारभावात फार मोठी सुधारणा झाली नाही. यावेळी धाऊक बाजारपेठेत आठ ते दहा रुपयाप्रमाणे फळे विकली गेली. त्यात चार रुपये प्रतिकिलो तोडण्याची मजुरी वजा करता शेतकर्‍यांच्या हाती चार ते पाच रुपये आले. त्यामुळे बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले.

दरम्यान सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची फळे असल्याने चिकूला मागणी कमी झाली आहे. त्यातच भर म्हणून दिल्ली- राजस्थान येथे चिकू वाहतूक करणारी मालगाडी देखील बंद असल्याने बाजारपेठेत वेळेवर चिकू पोहचत नसल्याने त्याचा ही चिकू बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे अखिल भारतीय चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी सांगितले. त्यात थंडीच्या दिवसात चिकु फळाला मागणी असते. पण सध्या खूप जास्त गर्मी वाढल्यामुळे चिकू फळाला मागणी देखील कमी आहे.

- Advertisement -

 

उन्हाळ्याच्या दिवसात चिकू फळाला मागणी कमी असते. या मुळे देखील आम्हाला फटका बसत आहे. सध्या चिकू उत्पादन चांगले असून भाव नसल्याने काढण्याची मेहनत देखील परवडत नाही.
– किरण पाटील.. चिकू बागायतदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -