घरपालघरसाधना सहकारी पतपेढीवर सहकारचे वर्चस्व

साधना सहकारी पतपेढीवर सहकारचे वर्चस्व

Subscribe

सहकार पॅनलच्या विरोधात पान मार्केटिंग सोसायटीचे अध्यक्ष रोहन घोन्सालवीस, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा आणि बॅसिन कॅथलिक बँकेचे माजी अध्यक्ष सचिन परेरा यांनी परिवर्तनाची हाक देत, आदर्श पॅनल निवडणुकीत उतरवले होते.

वसईः साधना सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत एकूण चौदापैकी तेरा जागा जिंकून सहकार पॅनलने आदर्श पॅनलचा दारुण पराभव करीत पुन्हा एकदा सत्ता राखली आहे.साधना सहकारी पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष, तथा ठाणे जिल्हा मधवर्ती बँकेचे तज्ञसंचालक अशोक कोलासो आणि अल्बर्ट अथाईत यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनलने हे यश संपादन केले. सहकार पॅनलच्या विरोधात पान मार्केटिंग सोसायटीचे अध्यक्ष रोहन घोन्सालवीस, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा आणि बॅसिन कॅथलिक बँकेचे माजी अध्यक्ष सचिन परेरा यांनी परिवर्तनाची हाक देत, आदर्श पॅनल निवडणुकीत उतरवले होते.

मात्र त्यांना एका जागेवरच समाधान मानावे लागले.नवीन संचालक मंडळामध्ये अशोक कोलासो, घोन्सलवीस ऑलन, अथाईत अलबर्ट, विद्यमान उपाध्यक्ष डिसिल्वा लेस्ली, विंसेन्ट आल्मेडा, कुटिन्हो निल, डिसोझा नेपोलियन, मिस्कीटा पास्कल, डिकून्हा जॉन, कायस फर्नांडिस, राजेश साजन, परेरा सिलवी ऍंथोनी आणि मचाडो लीना गॅरी आदी सहकार पॅनलचे तेरा संचालक निवडून आले आहेत. आदर्श पॅनलचे अनुसूचित जातीजमाती प्रवर्गातून विनायक किसान वायडा हे आधीच बिनविरोध निवडून आल्याने आदर्श पॅनलने यंदा सत्ता परिवर्तन होईल, असा दावा केला होता. मात्र, तो सभासद मतदारांनी फोल ठरवला.ो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -