घरताज्या घडामोडीधक्कादायक! आकोल्यात अवकाळी पावसामुळे झाड कोसळून 4 जणांचा मृत्यू

धक्कादायक! आकोल्यात अवकाळी पावसामुळे झाड कोसळून 4 जणांचा मृत्यू

Subscribe

अवकाळी पावसामुळे झाड कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली. अकोल्यातील पारस गावातील एका मंदिराच्या शेडवर झाड कोसळले. या शेडमधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

अवकाळी पावसामुळे झाड कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली. अकोल्यातील पारस गावातील एका मंदिराच्या शेडवर झाड कोसळले. या शेडमधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. या शेडखाली आणखी काही भाविक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (maharashtra unseasonal rain update akola tree collapse 4 Death)

राज्यात सध्या अवकाळी पावासाचा कहर सुरु आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आज अकोल्यातही अवकाळी पावासाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे मदतीला अडचण निर्माण होत आहे. सततच्या पावसामुळे झाड बाजूला करताना अडचणी येत आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील पारस गावात जोरदार पावसामुळे लिंबाचे मोठे झाड बाबूजी महाराज मंदिराच्या शेडवर कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. या शेडखाली काही भाविक दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळावर हवा आणि पावसाने मदत कार्यात अडचण होत आहे. स्थानिकांच्या मदतीने हे झाड हटवण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील कान्हेरागावनाका वाढोना कलबुर्गा चींचपुरी मोप फळेगाव भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. हळद भाजीपाला पिके त्याचबरोबर फळबागांचे या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय, नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. देवळा, नांदगाव, कळवण मध्ये गारपीट झाली आहे. नांदगावच्या शास्त्रीनगर, धनेर, पोखरी, बोलठाणसह परिसरात सायंकाळच्या सुमारास जोरदार गारपीट झाल्याने सर्वत्र गारांचा खच पडून उन्हाळ, कांदा बियाण्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर कळवणच्या मानूर, देवळा तालुक्यातील चिंचवे, वाजगाव परिसरातही गारा पडल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अवकाळी पावसाचा पुण्याला फटका; वीज गेल्याने नागरिक हैराण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -