घरपालघरखासदारांच्या आंदोलनानंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग

खासदारांच्या आंदोलनानंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग

Subscribe

अपघात क्षेत्रात अतिरिक्त सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे. महामार्गावर पाणी साचत असलेल्या ठिकाणी उघड्या बनवण्यात येणार आहेत.

वसईः मुंबई -अहमदाबाद महामार्गाची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते दुरुस्ती व्हावी यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही कामे झाली नसल्यामुळे, शुक्रवारी खासदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली खानिवडे आणि चारोटी नाका येथे निषेध व्यक्त करत, एक दिवसीय टोलबंदी आंदोलन केले. या बंदची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढील आठ दिवसांच्या कालावधीत रस्त्याच्या देखभालीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी खड्ड्यांमुळे जनतेला होणार्‍या त्रासाच्या विरोधात केलेल्या आंदोलनाची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली असून, प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी महामार्गाच्या संपूर्ण देखभालीच्या कार्यवाहीबाबत लेखी माहिती खासदारांना दिली आहे. खड्डे दुरुस्तीचे ९७ ते ९८ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत सर्व कामे येत्या ८ दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहेत. सेवा मार्गाच्या (सर्व्हिस रोड) देखभालीचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे ८ ते १० दिवसांचा कालावधी लागणार आहे. नवे सेवा मार्ग बनवण्यासाठीची पूर्व तयारी सुरू आहे. खड्ड्यांवर उपाय म्हणून १२१ किलोमीटरपर्यंत व्हाईट टॉपिंग केले जाणार आहे. नवे ४०० पथदिवे लावले जाणार असून इतर दिव्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. अपघात क्षेत्रात अतिरिक्त सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे. महामार्गावर पाणी साचत असलेल्या ठिकाणी उघड्या बनवण्यात येणार आहेत. टोल नाक्यावर स्थानिक रहिवाशांना कर्मचारी म्हणून नियुक्त केले जाणार आहेत. आदी मागण्या मान्य केल्याचे पत्रात नमूद करण्यात आले असून प्राधिकरणामार्फत कार्यवाही केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
०००
एप्रिल महिन्यापासूनच महामार्गाची दुरुस्ती व्हावी यासाठी अनेक प्रयत्न केले. सातत्याने पाठपुरावे केले. मात्र तरी कामे पूर्ण होण्यात दिरंगाई होत होती. ज्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत होता. यामुळेच सत्तेत असूनही नागरिकांच्या हक्कासाठी, त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनामुळेच महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार असून, नागरिकांचा त्रास संपून त्यांना दिलासा मिळेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने निषेधाची दखल घेत, सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, हेच या खड्डे विरुद्ध, एक दिवसीय टोलबंद आंदोलनाचे यश आहे.
—राजेंद्र गावीत, खासदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -