घरपालघरजंजीरे- धारावी किल्ला जतन समितीचा मंत्र्यांकडून सन्मान

जंजीरे- धारावी किल्ला जतन समितीचा मंत्र्यांकडून सन्मान

Subscribe

संवर्धन करणार्‍या संस्थांना जमेल तितकी मदत शासनामार्फत करून किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यात येईल, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले आहे.

भाईंदर :- मिरा-भाईंदर शहरातील जंजीरे धारावी किल्ला जतन समितीला राज्यातील ५० किल्ले संवर्धन करणार्‍या संस्थांचा विशेष सन्मान कार्यक्रमात आमंत्रित करून महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.मिरा-भाईंदर शहरात गेली ५ वर्ष सतत जंजीरे धारावी किल्ल्यावर संवर्धन तसेच स्वच्छता मोहिम घेऊन त्याच्या डागडुजीच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा चालू ठेवण्यात आला होता.संवर्धन करणार्‍या संस्थांना जमेल तितकी मदत शासनामार्फत करून किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यात येईल, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले आहे.

कार्यक्रमात राज्यातील गडकोटांवर काम करणार्‍या सर्व संस्थांना एकत्रित करून एक समिती स्थापन करण्याचे ठरविण्यात आले आहे. किल्ले संवर्धन करणार्‍या प्रत्येक संस्थेतील १०० मावळ्यांचे मेडिकल इंश्युरन्स काढून देण्यात येणार आहे. किल्ले संवर्धन करणार्‍या ५० संस्थांना १५ हजाराचे किट उदा. घमेले, फावडा, टिकाव, पारई, कोयते इ. वस्तू लोढा फाऊंडेशन मार्फत देण्यात येणार आहेत. संवर्धन करणार्‍या संस्थांना जमेल तितकी मदत शासनामार्फत करून किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यात येईल, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले आहे. हा सन्मान फक्त जंजीरे धारावी किल्ला जतन समितीचा नसून मिरा-भाईंदर शहरातील प्रत्येक शिवप्रेमींचा असल्याचे जंजीरे धारावी किल्ला जतन समितीचे अध्यक्ष श्रेयश सावंत यांनी सांगितले आहे. सदर कार्यक्रमात जंजीरे धारावी किल्ला जतन समितीचे अध्यक्ष श्रेयश सावंत, निखिल पाटील, विशाल अग्रहरी, आशिष लोटणकर, सोमेश लायसे, निखिल एकनाथ पाटील उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -