घरपालघरJawhar News: जव्हारचे तापमान अबकी बार ४० अंश सेल्सियस पार

Jawhar News: जव्हारचे तापमान अबकी बार ४० अंश सेल्सियस पार

Subscribe

तापमापीचा पारा हा ४० अंशाच्या चढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहर तथा ग्रामीण भगात गेल्या एक महिन्यापासून तापमान ४० अंशावर गेले आहे.

जव्हार: तालुक्यासह परिसरात यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच तापमानात सतत वाढ झाली आहे. अपवाद वगळता या भागाचे तापमान ४० अंशापेक्षा अधिकच नोंदवले गेले आहे. त्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमानाने ४० अंशाच्या पुढचा टप्पा गाठल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शेती, व्यापारावरही परिणाम जाणवत आहेत. शेतशिवारातील कामे संथ गतीने सुरू आहेत. विवाह समारंभ, व धार्मिक कार्यक्रमातील उपस्थितीही घटली आहे. जव्हारमध्ये वणवे लागणे, जंगलतोड होणे या कारणाने वनसंपत्ती धोक्यात येवून सूर्य आग ओकत आहे, पर्यावरणाचा समतोल ढासळून वाढलेल्या तापमानामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे.तापमापीचा पारा हा ४० अंशाच्या चढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहर तथा ग्रामीण भगात गेल्या एक महिन्यापासून तापमान ४० अंशावर गेले आहे.

शनिवारी (ता. चार) कमाल तापमान ४१ सेल्सिअस तर किमान तापमान २३.५ सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तर शुक्रवारी (ता. तीन) कमाल तापमान ४२ अंश किमान तापमान २४ अंश नोंदवले गेले आहे. गुरुवारी (ता. दोन) कमाल तापमान ४२ अंश तर किमान तापमान २३ अंश नोंदविले गेले. बुधवारी (ता. एक) कमाल तापमान ४२ अंश तर किमान तापमान २३ अंश नोंदवले गेले आहे. मंगळवारी (ता. ३०) कमाल तापमान ४१ सेल्सिअस तर किमान तापमान २२ सेल्सिअस इतके टाकळी येथील सरिता मापन केंद्रात नोंदवले गेले आहे. वाढत्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होत आहेत. गेल्या चार दिवसांत रुग्णसंख्येत सततची वाढ होत असल्याची स्थिती आहे. अंगदुखी, डोळे जळजळणे, ताप, सर्दी, खोकला, अशक्तपणा, मळमळणे, चक्कर येणे असा व्याधींचे रुग्ण वाढले आहेत. तालुक्यातील शासकीय रुग्णालयासह खासगी दवाखान्यातील रुग्णसंख्या वाढली आहे. तीव्र उन्हाळा सुरू असला तरी लग्नकार्ये मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या लग्नकार्यांना जाण्याशिवाय पर्याय नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलेही कडक उन्हात घराबाहेर पडत आहेत. त्यातही एसटीबससह खासगी वाहनांनी प्रवास करणार्‍या नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. बसमध्ये उन्हासह गर्दीचाही सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

वाढत्या तापमानात आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यासाठी पहाटे लवकर उठणे, प्राणायाम, योग, ध्यानधारणा, त्यातही दीर्घ श्वसनाशी संबंधित ध्यानधारणा वाढवणे गरजेचे आहे. शिवाय सात्विक आहार घेणे, थंड ताक, लिंबू सरबत, फळांचा रस, भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. तळलेले व हॉटेलमधील चमचमीत मसालेदार खाद्यपदार्थ टाळावेत. एकाच वेळी भरपेट जेवण करण्याऐवजी तीन ते चार वेळा थोडे-थोडे जेवण करावे. आहारात द्रवपदार्थांचा समावेश अधिक असावा.

– सविता पवार, आहारतज्ज्ञ, जव्हार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -