घरपालघरअंगझडती घेतल्यावर गांजा सापडला

अंगझडती घेतल्यावर गांजा सापडला

Subscribe

. तो गांजा येणार्‍या ग्राहकांना विकत होता. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो गांजा दहिसर येथून आणत असल्याचे त्यांनी सांगितले.

भाईंदर : नयानगर पोलीस ठाणे हद्दीत पय्याडे हॉटेलच्या पाठीमागे उद्यानाच्या बाजूला मिरारोड येथे एका इसमाला अमली पदार्थ विरोधी पथकाने एका पवन जाधव या आरोपीला गांजा हा अमली पदार्थ विकताना अटक केली आहे. त्याच्याकडून 1लाख १९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नयानगर पोलीस ठाणे हद्दीत अमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना पय्याडे हॉटेलच्या पाठीमागे, उद्यानाच्या बाजूला, मिरारोड येथे एक इसम संशयास्पद हालचाल करताना दिसून आला. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा हा पदार्थ मिळून आला. त्यामध्ये ५७ प्लास्टिक पिशव्यामध्ये भरलेला ५१० ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. तो गांजा येणार्‍या ग्राहकांना विकत होता. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो गांजा दहिसर येथून आणत असल्याचे त्यांनी सांगितले. ५१० ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ, मोटार सायकल, २ मोबाईल व इतर साहित्य असे १ लाख १९ हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोहर व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ नुसार कलम २० ( ब), (२), ८ (क) नुसार नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -