घरपालघरआर्थिक स्थिती चांगली,अनुदान घेताय ? कारवाई होणार

आर्थिक स्थिती चांगली,अनुदान घेताय ? कारवाई होणार

Subscribe

त्यामुळे भविष्यात आर्थिक स्थिती चांगली असलेल्या नागरिकांचे सर्व्हेक्षण झाल्यास त्यांच्याकडून ४२ रूपये प्रती किलो गहू व ३२ रूपये प्रती किलो तांदुळ अशा भावाने वसुली केली जाईल, असा इशारा शासनाने दिला आहे.

वसई : आर्थिक स्थिती चांगली असलेल्या नागरिकांनी अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर न पडल्यास भविष्यात त्यांच्यावर कारवाई करून बाजारभावाने वसुली केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधील लाभार्थ्यांना राज्य शासनाने अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा, असे आवाहन केले आहे. मात्र या योजनेसंदर्भात शासनाने आवाहन करूनही आर्थिक स्थिती चांगली असलेल्या नागरिकांनी त्याकडे कानाडोळा केला आहे. शासनाने ग्रामीण भागात ४४ हजार व शहरी भागात ५९ हजार असे वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांनी या योजनेतून बाहेर पडा, असे आवाहन केले होते. मात्र अद्याप बहुतांश वसईकरांनी तसा अर्ज घेण्यास नकार दर्शवला आहे. त्यामुळे भविष्यात आर्थिक स्थिती चांगली असलेल्या नागरिकांचे सर्व्हेक्षण झाल्यास त्यांच्याकडून ४२ रूपये प्रती किलो गहू व ३२ रूपये प्रती किलो तांदुळ अशा भावाने वसुली केली जाईल, असा इशारा शासनाने दिला आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याकरता शासनावर येणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी तसेच या योजनेचा खर्‍या अर्थाने गरज असलेल्या लाभार्थ्यांनाच लाभ व्हावा, या हेतूने सदरचा गिव्ह ईट अप उपक्रम शासनाने अंमलात आणला आहे. शासनाने याबाबत आवाहन केल्यानंतर अद्याप तरी आर्थिक स्थिती चांगली असलेल्या वसईकरांनी या योजनेतून बाहेर पडण्यासाठी हवा तसा प्रतिसाद दर्शवलेला नाही.
शासनाकडून वितरीत करण्यात आलेले अर्ज घेण्यास देखील वसईकरांनी नकार दर्शवला आहे. याबाबत शासनाने स्थिती चांगली असलेल्या लाभार्थ्यांनी स्वत:हून सदरचा लाभ सोडला नाही तर शासनाकडून होणार्‍या सर्व्हेक्षणात दोषी आढळणार्‍या नागरिकांकडून गहू ४२ तर तांदुळ ३२ रूपये प्रती किलो दराने वसुली केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -