घरपालघरवाडा पंचायत समितीत सामना टाय ? सुपरओव्हरवरील निर्णयासाठी बैठक

वाडा पंचायत समितीत सामना टाय ? सुपरओव्हरवरील निर्णयासाठी बैठक

Subscribe

या अविश्वास ठरावाने वाड्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

वाडा: राज्यात गेल्या दीड वर्षांत नवी राजकीय समीकरणे पाहायला मिळाली.शिवसेना (शिंदे गट),आणि राष्ट्रवादी(अजित पवार) यांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यावर त्याचे पडसाद पंचायत समिती स्तरावर देखील उमटायला सुरूवात झाली आहे. वाडा पंचायत समितीत देखील वेगळे चित्र नाही.कारण सभापती अस्मिता लहांगे आणि उपसभापती जगदीश पाटील या दोघांवर परस्परविरोधी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला असून याबाबत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी आज गुरुवार 29 फेब्रुवारी रोजी वाड्याचे उपविभागीय अधिकारी भवानजी आगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या अविश्वास ठरावाने वाड्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
वाडा पंचायत समितीची सदस्य संख्या 12 असून महाविकास आघाडीने पंचायत समितीवर आपली सत्ता स्थापन केली होती. यावेळी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात आले होते. मात्र आता राज्यातील बदलती राजकीय स्थितीमुळे आता महायुतीची ६ सदस्य संख्या आहे. यात भाजप दोन, शिवसेना एकनाथ शिंदे गट दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट दोन अशी एकूण सहा सदस्य संख्या आहे. तर महाविकास आघाडीचे संख्याबल सहा असून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे चार तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन असे एकूण सहा सदस्य संख्या आहे. महायुतीने आता सभापती अस्मिता लहांगे यांच्याविरोधात तर महाविकास आघाडीने उपसभापती जगदीश पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी एका पत्राद्वारे आज गुरुवार 29 रोजी विशेष बैठक उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली आहे.दरम्यान, अविश्वास ठराव मंजूर होतो की बारगळतो याबाबतची उत्सुकता तालुक्यातील नागरिकांना लागून राहिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -