घरपालघर२२ लाखांचे मोबाईल व इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला

२२ लाखांचे मोबाईल व इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला

Subscribe

त्या टेम्पोवर चालक असलेला पेनकर पाडा येथे राहतो. दररोज रात्री उशिरा साहित्य घेऊन आल्यानंतर रात्री टेम्पो पेनकर पाडा येथे उभा करून ठेवतात. नेहमीप्रमाणे टेम्पोमध्ये साहित्य भरून पेनकरपाडा येथे उभा केला होता.

भाईंदर :- काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीतील पेनकरपाडा येथे क्रोमा इलेक्ट्रॉनिक सेंटरच्या दुकानाचे सामान भरून ठेवलेल्या टेम्पोतून २२ लाखांचे मोबाईल व इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरारोड परिसरातील पेनकरपाडा गावातील अनिकेत नवनाथ पवार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांचा भाईंदर येथील एका इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करणार्‍या दुकानामध्ये टेम्पो चालतो. त्या टेम्पोतून दररोज दुकानासाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक साहित्य भिवंडी येथून घेऊन येतात. त्या टेम्पोवर चालक असलेला पेनकर पाडा येथे राहतो. दररोज रात्री उशिरा साहित्य घेऊन आल्यानंतर रात्री टेम्पो पेनकर पाडा येथे उभा करून ठेवतात. नेहमीप्रमाणे टेम्पोमध्ये साहित्य भरून पेनकरपाडा येथे उभा केला होता.

त्यामध्ये टी. व्ही. फ्रिज, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्पुटर ऍक्सेसरीज असे इलेक्ट्रॉनीक्स साहीत्य होते. दुसर्‍या दिवशी सकाळी येऊन पाहिले असता टेम्पोमध्ये मोबाईलचे रिकामे बॉक्स पडलेले व दरवाज्याचा लॉक तोडलेला दिसला. तेव्हा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी टेम्पोच्या दरवाजाचे लॉक तोडून आत वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, वॉच, पेनड्राईव्ह, हेअर ड्रायर, इलेक्ट्रॉनिक घड्याळ असे ईलेक्ट्रॉनिक सामान चोरीस गेल्याचे आढळून आले. हे साहित्य २१ लाख ९१ हजार ७०२ रुपयांचे होते. त्यामुळे अज्ञात चोरट्यांचा विरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम हे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -