घरपालघरNalasopara Fire:गॅसपुरवठा बंद केल्याने नागरिक रस्त्यावर

Nalasopara Fire:गॅसपुरवठा बंद केल्याने नागरिक रस्त्यावर

Subscribe

यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. गुजरात गॅस कंपनीच्या अधिकार्‍यांना नागरिकांच्या संतापामुळे काढता पाय घेतला.

वसई: मंगळवारी दुपारी नालासोपारा पश्चिमेच्या आचोळे येथे गॅस पाईपलाईन फुटल्याने लागलेल्या आगीत द्वारका हॉटेल जळून खाक झाले होते. या आगीत हॉटेलमध्ये आलेले ८ ग्राहक आणि कर्मचारी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हॉटेलसमोर गटाराचे काम सुरू असताना गॅसपाईप लाईन फुटल्याने ही आग लागली होती. गॅस लाइन फुटल्यानंतर गुजरात गॅस कंपनीने संपूर्ण परिसरातील गॅस पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे येथील सुमारे तीनशे कुटुंबांचा घरातील स्वयंपाकघर बंद आहे. लोक बाहेरून जेवण मागवत आहेत. तीन दिवस झाले तरी गॅस पुरवठा पूर्ववत झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला. यामुळे गुरुवारी सकाळी परिसरातील शेकडो संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. तासभर नागरिकांनी गोंधळ घातला. यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. गुजरात गॅस कंपनीच्या अधिकार्‍यांना नागरिकांच्या संतापामुळे काढता पाय घेतला.

या ठिकाणी गटाराचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने केले जात होते. या कामामुळे अनेक दुकानांचेही नुकसान झाले होते. ज्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे, त्या ठिकाणी अतिशय जुन्या इमारती आहेत. त्यामुळे पोलिसांनी दुर्घटनेची शक्यता वर्तवली होती. आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ बाळासाहेब पवार यांनी १७ एप्रिल रोजी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन चौकशीची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी वर्तवलेली शक्यता खरी ठरली आणि मंगळवारी आग लागली. गटाराचे काम सुरू असताना पोकलेनमुळे गुजरात गॅस कंपनीची पाइपलाइन फुटली. यामुळे स्फोट होऊन भीषण आग लागली. आगीने संपूर्ण हॉटेलला वेढले. हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -