Eco friendly bappa Competition
घर पालघर अवजड वाहतुकीमुळे नवघर - घाटीम रस्त्याची दुर्दशा

अवजड वाहतुकीमुळे नवघर – घाटीम रस्त्याची दुर्दशा

Subscribe

सद्या स्थितीत सदर रस्त्यावरून येणे-जाणे नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. आजवर अनेक अपघात या रस्त्यामुळे झाले आहेत.

सफाळे: पालघर तालुक्यातील सफाळे पूर्वेकडील नवघर – घाटीम रस्त्याची अवजड वाहतुकीमुळे अक्षरशः दुर्दशा झाली असून स्थानिकांना प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. तसेच अवघ्या काहीच दिवसांवर गणेशोत्सव देखील आला असून या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याबाबत शिवसेना (उबाठा) पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी जिल्हा प्रशासन आणि सफाळे पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देवून रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. पालघर तालुक्यातील सफाळे (पुर्व) येथील नवघर घाटीम रस्ता गेले ३-४ वर्षापासून मुंबई-बडोदरा एक्सप्रेसच्या कामासाठी (G.R.I.L.) या ठेकेदार कंपनीने अवजड वाहने चालवुन खुप खराब केला आहे. सदर रस्त्याचा वापर करण्यापुर्वी जिल्हा परिषद पालघर यांची कोणतीही परवानगी न घेता ही कंपनी रस्त्याचा वापर करीत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे प्रकल्पासाठी वापरात असलेल्या ठेकेदाराने रस्ता सुस्थितीत ठेवण्याचे कर्तव्य आहे. सद्या स्थितीत सदर रस्त्यावरून येणे-जाणे नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. आजवर अनेक अपघात या रस्त्यामुळे झाले आहेत. त्यातच हिंदु धर्माचे महत्वाचे सण काहीच दिवसात आले असून नागरीकांचे येणे जाणे वाढले असून त्यांचे हाल होत आहेत.

त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी सदर रस्त्याचे खड्डे लेव्हल करून घ्यावे व पावसाळयानंतर पुर्ण रस्ता मजबुतीकरण करून घ्यावा. अशी मागणी शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे केली असून शुक्रवारी ग्रामस्थांसह शिवसैनिकांनी सफाळे पोलिसांनाही निवेदन देवून सदर कंपनीकडून रस्ता दुरुस्त करून देण्याबाबत व आंदोलनाबाबत निवेदन दिले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनुप पाटील, तालुका प्रमुख नचिकेत पाटील ,युवासेना उपजिल्हा अधिकारी संदिप किणी, पंचायत समिती सदस्या कामिनी पाटील ,उपसरपंच सोनावे सायली किणी ,उपविभाग युवा अधिकारी हृतिक पाटील ,नवघर ग्रा.स. शरद पाटील तसेच चंद्रकांत दळवी ,ग्रामस्थ राकेश पाटील, दयानंद पाटील, राजेंद्र पाटील, गजानन पाटील, कैलाश पाटील, रंजन पाटील, निलेश पाटील, दर्शन पाटील व रिक्षा चालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

 

येत्या आठ दिवसांत नवघर – घाटीम रस्त्याची दुरुस्ती न केल्यास सर्व ग्रामस्थांसोबत आम्हांला रास्तारोको आंदोलन करावे लागेल.
– संदिप किणी, युवासेना, उपजिल्हा अधिकारी.

- Advertisement -

यंत्रणांना पत्र व्यवहार करून व GR कंपनीशी बोलून 8 दिवसांच्या आत रस्ता दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतो.
– अविनाश मांदळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सफाळे पोलीस स्टेशन.

 

- Advertisment -