घरपालघरएकही आदिवासी कष्टकरी बांधव अंधारात राहता कामा नये

एकही आदिवासी कष्टकरी बांधव अंधारात राहता कामा नये

Subscribe

सदर लोकांच्या अडचणी व तक्रारीला न्याय देण्यासाठी आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनोर ग्रामपंचायत येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सफाळे: पालघर तालुक्यातील मनोर भागातील आदिवासी, कष्टकरी समाज बांधवांच्या वाढीव विजबिले व रीडिंग न घेता सरसकट अंदाजे बिल देण्याविषयीच्या महावितरणाबाबत तक्रारी वाढत होत्या. तसेच ग्राहकांवर प्रलंबित नोटीस देखील काढण्यात आल्या होत्या. मात्र लोक न्यायालयात एकाही ग्राहकाच्या विजबिलाबाबत तडजोड करण्यात आली नाही. सदर लोकांच्या अडचणी व तक्रारीला न्याय देण्यासाठी आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनोर ग्रामपंचायत येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार राजेश पाटील यांनी ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेताना रीडिंग न घेता सरसकट व वाढीव बिले देण्यावर नाराजी व्यक्त करून, महावितरण अधिक्षक अभियंता कानडे यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच बिलांवरील अधिभार रद्द किंवा कमी तातडीने करण्यात यावा आणि थकित बिलांचे हप्ते बांधून देत टप्पा टप्यात वसुली करावी असे आदेश दिले. फॉल्टी मीटर काढून त्वरित नवीन मीटर उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना देखील पाटील यांनी केली.

मनोर हे वेगाने विकसित होत असून तिथे त्वरित लोकसंख्येच्या प्रमाणात जादा ट्रान्सफार्मर बसविण्यात यावेत, अशी सूचना आमदार पाटील यांनी महावितरणला केली. इथे इंडस्ट्री वाढत असताना वीज खंडित होणे हे मालकाच्या व कामगारांच्या दृष्टीने नुकसानीचे आहे. तेव्हा वीज पुरवठा सुरळीत करून त्यांची होणारी गैरसोय त्वरित दूर करावी अशा सूचना महावितरण अधिकार्‍यांना देण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येक शनिवारी सावरखडे येथे विज बिलांच्या तक्रारी सोडवण्यात येतील असे आश्वासन महावितरणचे अधिक्षक अभियंता कानडे यांनी दिले.यावेळी मनोर गावचे सरपंच चेतन पाटील,बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते पांडुरंग गोवारी, बहुजन विकास आघाडी सरचिटणीस दिलीप गायकवाड,समीर मुल्ला,मनोरचे उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -