घरनवी मुंबईमाथाडी कामगार कायद्याचा (Mathadi Act will not be repealed) आत्मा कायम राहील

माथाडी कामगार कायद्याचा (Mathadi Act will not be repealed) आत्मा कायम राहील

Subscribe

उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेळाव्यात आश्वासन; स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांची ९० वी जयंती साजरी

नवी मुंबई-
माथाडींचे प्रेरणास्थान स्व.अण्णासाहेब पाटील यांनी त्याकाळात माथाडी कायदा तयार करुन घेतला. माथाडी कायद्याला ५० वर्ष पुर्ण झाली आहेत. माथाडींसाठी असणारा कायदा (mathadi-Act) कोणत्याही परिस्थितीत आणि कोणतीही छेडछाड करुन रद्द होऊ देणार नाही. माथाडी कामगार कायद्याचा आत्मा कायम राहिल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिले. नवी मुंबईतील कांदा-बटाटा लिलावगृहात  सोमवार २५ सप्टेंबर रोजी स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९० व्या जयंतीच्या (90th birth anniversary of Annasaheb Patil) निमित्ताने महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल युनियन आयोजित माथाडी कामगार मेळावा आणि माथाडी भूषण पुरस्कार सन्मान, माथाडी युनियनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन प्रमुख अतिथी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आ.प्रवीण दरेकर, आ.प्रसाद लाड,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, ऐरोलीचे आ.गणेश नाईक, बेलापूरच्या आ.मंदा म्हात्रे, आ.निरंजन डावखरे, आ.शशिकांत शिंदे,भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खा.संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पोपटराव देशमुख आणि लोकप्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी मार्गदर्शन करताना माथाडींचे नेते आ.नरेंद्र पाटील यांनी कायद्याचा ढाचा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. माथाडी कायदा अतिशय चांगला आहे. त्याचा वापर अधिकारी वर्गाकडून चुकीचा केला जातो. बोगस माथाडी संघटनांवर सरकारने आणि गृहविभागाने कारवाई करण्याची मागणी केली.
  उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माथाडींचे नेते शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील यांनी मेळाव्यात मांडलेल्या विविध विषयांवर विवेचन करुन सरकारची भुमिका मांडली. माथाडींसाठी कायदा असतानाही बोगस माथाडी संघटनामुळे प्रामाणिक माथाडींची बदनामी होत आहे. कायद्याच्या पळवाटा शोधून बोगस माथाडी कामागारांच्या टोळी मोकाट सुटतात. त्याला पळवाटा न देता जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासित केले. माथाडी कामागार कायद्यामध्ये बदल करण्यासाठी अधिकृत माथाडी संघटनेकडून जे बदल व सूचना केल्या जातील त्याचा कायद्यात समावेश करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.
लवकरच माथाडीत भरती
राज्य सरकारच्या माध्यमातून विविध आस्थापनात रिक्त असणारी पदे भरण्यात येत आहेत. सारथी पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया करण्यात येत आहे.७० टक्के माथाडी सेवानिवृत्त झाले आहेत.त्या पार्श्वभूमीवर माथाडी बोर्डाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
बाजार संकुल पुनर्वसनाचा आराखडा तयार
मोठी आर्थिक उलाढाल असणार्‍या एपीएमसी बाजार समितीतील जुनाट व अतिधोकादायक गाळयांमध्ये माथाडी कामगार जीव मुठीत धरुन काम करत असल्याची कैफीयत माथाडींचे नेते नरेंद्र पाटील यांनी वारंवार सरकारकडे मांडली होती. त्या विषयी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बाजार समितीच्या पुर्नवसनाचा आराखडा सरकारने तयार केला आहे. त्याचा आपण स्वत: आढावा घेतला असून माथाडी कामगार संघटना, बाजार समिती सदस्यां समवेत एक बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
माथाडींच्या सिडको घरांसाठी प्रयत्न
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ठिकाणी कामगार काम करतात त्यांना त्याच ठिकाणी घर मिळावे, अशी भुमिका घेतली आहे.नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून घरे मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलून पाच एकरचा भुखंड सिडकोकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
बोगस माथाडी संघटनेवर आठ दिवसात कारवाई
माथाडींच्या नावार अनेक बोगस संघटना कार्यरत आहेत. या संघटनाकडून पैसे उकळण्याचे प्रकार सुरु आहेत. अशा बोगस संघटनांवर कारवाई करण्याची मागणी आ.नरेंद्र पाटील यांनी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अ‍ॅग्रीमेंट बनवून पैसे उकळणार्‍या बोगस संघटनांवर येत्या आठ दिवसात नवी मुंंबई पोलिसांनी कारवाई करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -