घरपालघरजिल्ह्यात पाऊस समस्यांचा,समाधानाचा आणि लगबगीचा

जिल्ह्यात पाऊस समस्यांचा,समाधानाचा आणि लगबगीचा

Subscribe

त्यानंतर मंगळवारपासून पावसाचे प्रमाण कमी होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक विभागाकडून देण्यात आला आहे.

टीम महानगर,वसई,भाईंदर,मनोर,बोईसर: उशीरा का होईना सुरू झालेला पाऊस पालघर जिल्ह्यातही जोरदार बरसत आहे.परंतु,वर्ष बदलले असले तरी समस्या त्याच आहेत किंबहुना वाढल्या आहेत.तर काही ठिकाणी उशीरा का होईना शेतकर्‍यांनी तयारी केली असून पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेले नागरिक देखील सुखावले आहेत. पुढील चार दिवस पालघर जिल्ह्याच्या काही भागात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने घराबाहेर पडताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शेतातील पिकांना फवारणी आणि खते देण्याची कामे पुढे ढकलण्याचे सांगण्यात आले आहे. सोमवारपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस कायम राहील.त्यानंतर मंगळवारपासून पावसाचे प्रमाण कमी होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक विभागाकडून देण्यात आला आहे.

पावसाळ्यात महामार्गाची महासमस्या

- Advertisement -

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई पूर्वेकडील ससूनवघर परिसरात पाणी साचून राहिल्याने ट्रफिक जाम झाले. तसेच दहा तासांपासून अनेक वाहने अडकून पडली होती. मुंबई-अहमदाबाद हायवेवर वसई पूर्वेकडील ससूनवघर परिसरात डोंगरावरून येणार्‍या पाण्याचा निचरा होणारे मार्ग बंद झाल्याने हायवेवरच पाणी जमा होऊन वाहतूक ठप्प होत असल्याचे गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येत आहे. पण, त्यावर कोणताही उपाय केला गेल्या नसल्याने यंदाही वाहतूक ठप्प होऊ लागली आहे. ससूनवघर परिसरात महामार्गावर एका बाजूला डोंगर आहे. तर दुसर्‍या बाजूला मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर भरणी करून अनेक बेकायदा हॉटेल्स, धाबे तयार झाले आहेत. तर डोंगरावरून येणारे पाणी पश्चिमेकडील खाडीत जाण्यासाठीचे नालेही बुजवण्यात आले आहेत. परिणामी पावसाळ्यात पाणी निचरा होत नसल्याने पाणी थेट महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबून राहत असल्याने वाहतूक ठप्प होत आहे.

 

- Advertisement -

उत्तनमध्ये आधी पाऊस नंतर दरडी कोसळल्या

मीरा-भाईंदर शहरात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उत्तन भागातील तीन ते चार ठिकाणी रस्त्यावरील दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये कोणती जीवित वा वित्तहानी झालेली नाही.
मीरा – भाईंदर शहरात बुधवारी मुसळधार पाऊस पडल्यामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे भाईंदर पश्चिमेच्या उत्तन डोंगरी जांभिरीजवळ असलेल्या आईस फॅक्टरी बस स्टॉप जवळ असलेल्या मुख्य रस्त्यावर तीन ते चार ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर दगड पडल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. याबाबत कोणताही अपघात होणार नाही याची काळजी घेण्याची मनपा प्रशासनाकडे माजी नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी मागणी केली होती.

रस्ता झाला खोटा,पाऊस आला मोठा

शाळेला जोडणार्‍या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बोईसरच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांवर मुसळधार पावसात आंदोलन करण्याची वेळ आली.तीन तास सुरू असलेले हे आंदोलन पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर मागे घेण्यात आले.
बोईसरच्या यादव नगर येथील श्री रघुवीर शाळेला जोडणार्‍या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे.या शाळेत विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी नवीन पक्का रस्ता बनविण्यात यावा यासाठी बोईसर ग्रामपंचायत आणि आमदार राजेश पाटील यांच्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केल्याचे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.मात्र अनेक वेळा मागणी करून सुद्धा पक्का रस्ता तयार करण्यात न आल्याने या पावसाळ्यात शाळेत ये-जा करण्यासाठी शेकडो विद्यार्थी यांच्यासोबतच शिक्षक आणि कर्मचार्‍यांना मार्गातील चिखल तुडवत शाळा गाठावी लागत आहे.शाळेच्या इमारतीपर्यंत पक्का रस्ता नसल्याने जवळपास ३०० मीटर आधीच वाहने थांबवून चिखलाच्या घाण पाण्यातून चालत जावे लागते. सकाळी ८ वाजता सुरू झालेले आंदोलन ११ वाजेपर्यंत सुरू होते.ग्रामपंचायत विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत चांगल्या रस्त्याची मागणी लावून धरली.या आंदोलनात विद्यार्थ्यांना शिक्षकांनी देखील साथ देत आंदोलनात सहभाग घेतला.अखेर बोईसर पोलिसांच्या मध्यस्तीनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र सकाळपासून विद्यार्थांनी शाळेच्या रस्त्यासाठी भर पावसात आंदोलन करून देखील बोईसर ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांपैकी एक ही जबाबदार लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी यांनी आंदोलनाची दखल न घेतल्याने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता.

कोणासाठी सुख,कोणासाठी दु:ख

वसईत दोन दिवस पडणार्‍या मुसळधार पावसामुळे तानसा नदीला पूर आला असून पहिल्या पावसातच तानसा नदीवरील पांढरतारा पुल पाण्याखाली गेल्याने पाच गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच परिसरातील शेती पाण्याखाली गेल्याने या पुरामुळे भात रोपाला नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सुरुवातीला अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने बुधवारी व गुरुवार या दोन दिवस मुसळधार हजेरी लावल्याने सर्व जंगलातील नदीनाले वाहू लागल्याने शिरवली, पारोळ, घाटेघर, उसगाव, चांदीप इ. गावातील शेती तानसा नदीला पूर आल्याने पाण्याखाली गेली. आडणे पुल व मेढे हे पूल ही पाण्याखाली गेले त्यामुळे नागरिकांचा मोठी गैरसोय झाली आहे.या तीन पुलांवर पाणी असल्याने भाताणे, आडणे, मेढे, अंबोडे, भिणार या गावातील नागरिकांना बाहेर जाण्यासाठी २० किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. पावसाने गैरसोय केली असली तरी मात्र उसगाव, हत्तीपाडा, पेल्हार या तीन धरणात पाणी पातळीत वाढ झाल्याने वसईकरांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -