घरपालघरगावे वगळण्याच्या याचिकेला पुन्हा तारीख

गावे वगळण्याच्या याचिकेला पुन्हा तारीख

Subscribe

गावे वगळण्याच्या निर्णयाला स्थगिती देणारी महापालिकेची याचिका बेकायदेशीर असल्याबाबत हस्तक्षेप याचिका दाखल करून विरोध करण्यात आला आहे.

वसईः वसई -विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याच्या प्रश्नांवर गुरुवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार होती. पण, प्रकरण सुनावणीला न आल्याने आता पुन्हा एकदा तारीख पडली असून येत्या ५ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. विविध कारणांमुळे या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडत असून गुरुवारी मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती गौतम पटेल व कमल काता यांच्या नव्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी होणार होती. पण, प्रकरण बोर्डावर न आल्याने येत्या ५ डिसेंबरची तारीख पडली आहे. वसई- विरार महापालिकेची २००९ मध्ये स्थापना झाल्यानंतर गावे वगळण्यासाठी वसईत मोठे आंदोलन झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने २९ गावे वगळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तत्कालीन महापौर राजीव पाटील यांनी २०११ साली गावे वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून पुन्हा एकदा गावे समाविष्ट करण्यात आली होती. गावे वगळण्यासंदर्भात वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. गावे वगळण्याच्या निर्णयाला स्थगिती देणारी महापालिकेची याचिका बेकायदेशीर असल्याबाबत हस्तक्षेप याचिका दाखल करून विरोध करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -