घरपालघरधान विक्रीसाठी नोंदणीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

धान विक्रीसाठी नोंदणीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Subscribe

अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी नोंदणीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यासंदर्भात आदेश काढले. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

वाडा : शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी आणि बोनसचा लाभ मिळवण्यासाठी शासनाच्या एई एम एच या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिर्वाय आहे. पण नोंदणीसाठी दिलेली मुदत १५ जानेवारीला संपली. त्यामुळे शासनाने पुन्हा ३१ जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. शेतकर्‍यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासन आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत शासकीय दान खरेदी भावाने धान खरेदी करते. पण मागील दोन- तीन वर्ष धान खरेदी केंद्रावर झालेल्या घोळामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री कारण्यासाठी एनईएमएल या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य केले. या पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांचे धान केंद्रावर खरेदी केले जाते. खरीप हंगामातील धानाची विक्री करण्यासाठी अनेक शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. तर बहुतांश शेतकरी नोंदणीच्या प्रतीक्षेत होते. मात्र नोंदणीची मुदत १५ जानेवारीला संपल्याने पुन्हा मुदतवाढ मिळते की काय याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले होते. अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी नोंदणीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यासंदर्भात आदेश काढले. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

बोनससाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य

- Advertisement -

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धानाला प्रति हेक्टर 20000 रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा केली. शेतकर्‍यांना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिर्वाय केले होते. मात्र, हजारो शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने बोनस मिळणार की नाही असे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -