घरपालघरसहा चाळमाफिया गजाआड

सहा चाळमाफिया गजाआड

Subscribe

त्यातच महापालिकेतील काही अधिकार्‍यांनी एजंटांमार्फत अशा अनधिकृत बांधकामांना अभय देऊन स्वतःचे उखळ पांढरे करत असल्याचाही फायदा चाळमाफियांना होत आहे.

वसईः मुंबई-अहमदाबाद हायवे परिसरात चाळमाफियांनी अनधिकृत बांधकामे करण्याचा धडाका लावला असून त्यांच्यावर कडक कारवाई होत नसल्याने त्यांना मोकळे रान मिळत आहे. मात्र, सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांनी दिलेल्या दणक्याने सहा चाळमाफिया गजाआड झाले आहेत. पोलीस त्यांच्या फरार साथिदारांचा शोध घेत आहेत. पेल्हार, वालीव आणि चंदनसार प्रभाग समित्या अनधिकृत बांधकामांची माहेरघर म्हणून ओळखली जातात. याठिकाणी खुलेआम बेकायदा चाळी, शेड्स, कंपन्या बांधल्या जात आहेत. मात्र, एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल होऊनही चाळमाफियांना अटक होत नव्हती. गुन्हा दाखल झाला की जामीन मिळवून लगेचच सुटका होत असल्याने चाळमाफियांची मनोबल उंचावल्याचे दिसत आहे. त्यातच महापालिकेतील काही अधिकार्‍यांनी एजंटांमार्फत अशा अनधिकृत बांधकामांना अभय देऊन स्वतःचे उखळ पांढरे करत असल्याचाही फायदा चाळमाफियांना होत आहे.

मात्र, पेल्हार प्रभाग समितीच्या कार्यभार स्विकारल्यानंतर सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांनी चाळमाफियांना जबरदस्त दणका दिला आहे. मुंबई -अहमदाबाद हायवेपरिसरात बाफाणे येथे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता तब्बल ४५० खोल्यांचे अनधिकृत बांधकाम करणार्‍या चाळमाफियांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम संखे यांनी केली. नायगाव पोलिसांनीही आक्रमक होत गुन्हा दाखल केल्यानंतर रामदुलारे राजभर, रमाशंकर तिवारी, मदन यादव, दिनेश पटेल, संतोषकुमार पांडे, संदीप यादव, प्रवीण प्रजापती या चाळमाफियांना अटक केली आहे. वसई कोर्टानेही या चाळमाफियांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावत दणका दिला आहे. अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी संखे यांनी नोटीसही दिली होती. पण, नेहमीप्रमाणेच नोटीशीला केराचा टोपली दाखवत चाळमाफियांनी अनधिकृत खोल्या बांधण्याचे काम सुरुच ठेवले होते. त्यामुळे नायगाव पोलीस ठाण्यात संखे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता आरोपींच्या फरार साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्हा दाखल होऊन थेट अटक होत असल्याने चाळमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -