घरपालघरस्वस्त धान्य दुकानात निकृष्ठ दर्जाच्या तांदळाचा पुरवठा

स्वस्त धान्य दुकानात निकृष्ठ दर्जाच्या तांदळाचा पुरवठा

Subscribe

दरम्यान प्रस्तुत प्रतिनिधींनी देवगाव येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट दिली असता तेथेही तुकडा तांदूळ दिसून आला.

वाडा:  तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमार्फत लाभार्थ्यांना सरकारकडून मोफत धान्य दिले जाते. मात्र या धान्यात गेल्या अनेक महिन्यापासून निकृष्ठ दर्जाचा तांदळाचा पुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी घोणसई ग्रामपंचायतीचे सदस्य अशोक घोरकणे यांनी केली आहे.
वाडा तालुक्यात 157 स्वस्त धान्य दुकाने मंजूर असून 127 दुकाने कार्यरत आहेत. तालुक्यात अंत्योदय योजनेचे 9 हजार 936 कार्ड तर प्राधान्य योजनेचे 18 हजार 366 लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थांना सरकारकडून मोफत धान्याचे वाटप केले जाते.यामध्ये तांदूळ व गव्हाचा पुरवठा केला जातो.

मात्र असे असतानाच गेल्या अनेक महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानात निकृष्ठ दर्जाचा तांदळाचा पुरवठा सरकारकडून केला जात आहे. जून महिन्यात अंत्योदय लाभार्थांना 1364 क्विंटल तर प्राधान्य लाभार्थांसाठी 1364 क्विंटल तांदूळ दिला आहे. मात्र हा दिला जाणारा तांदूळ निकृष्ठ दर्जाचा दिला गेला आहे. तांदळामध्ये अर्धा तुकडा मोठ्या प्रमाणात असून असा तांदूळ गोरगरीब आदिवासी नागरिकांना दिला जात असल्याने त्यांनी प्रशासन व शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील घोणसई येथील स्वस्त धान्य दुकानात ग्रामपंचायतीचे सदस्य विशाल पाटील व अशोक घोरकणे यांनी भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांनी संबंधित दुकानदाराला निकृष्ठ दर्जाचा तांदूळ न देण्याच्या सुचना केल्या. दरम्यान प्रस्तुत प्रतिनिधींनी देवगाव येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट दिली असता तेथेही तुकडा तांदूळ दिसून आला.

- Advertisement -

सरकार मोफत धान्य वाटप करीत असल्याचा डांगोरा पिटत असून आदिवासी व गोरगरीब जनतेला असा निकृष्ठ दर्जाचा तांदूळ वाटप करून त्यांच्या आरोग्याशी खेळत होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करा.

-अशोक घोरकणे
सदस्य, ग्रामपंचायत घोणसई मेट

- Advertisement -

तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात अशा प्रकारचा निकृष्ठ दर्जाचा तांदूळ आला असेल तर त्या स्वस्त धान्य दुकानदाराने आमच्याकडे तक्रार केल्यास तो तांदळाचा साठा परत घेण्यात येईल.
– दिलीप काळे
प्रभारी पुरवठा अधिकारी, वाडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -