घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'डिजिटल इंडिया' : सर्व्हर डाउनचा फटका, महा ई-सेवा केंद्र झाली ठप्प; अॅडमिशनला...

‘डिजिटल इंडिया’ : सर्व्हर डाउनचा फटका, महा ई-सेवा केंद्र झाली ठप्प; अॅडमिशनला होणार अडथळा?

Subscribe

नाशिक : शैक्षणिक कामांसाठी लागणारी कागदपत्रे, दाखले व नागरिकांना व्यक्तिगत कामासाठी लागणारे दाखले, कागदपत्र मिळविण्यासाठी महाईसेवा व नागरी सुविधा केंद्रातून सर्व्हर डाऊन या तांत्रिक अडचणी मुळे वेळ जात आहे. संथ गतीने चालणा-या ऑनलाईन सेवेमुळे नागरिकांना तासनतास महाईसेवा केंद्र,नागरी सुविधा केंद्रात थांबावे लागत आहे.

राज्य सरकारच्या महाआयटी विभागामार्फत महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून शासकीय अनुज्ञप्ती, जात पडताळणी दाखले – प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन देण्यात येतात. गेल्या तीन चार दिवसांपासून महा – ऑनलाइनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने या सर्व केंद्रावरील कामकाज तांत्रिक कारणास्तव रखडले आहे. त्यामुळे इतर कामकाजासाठी देखील या केंद्रांवर रांगा लावल्याचे दिसून येत असून अनेक केंद्र बिघाड असल्यामुळे बंद ठेवण्यात आली आहेत.

- Advertisement -

दरम्यान, तसेच दहावी, बारावीच्या वर्गांचा निकाल जाहीर झाला असून महाविद्यालयीन प्रवेशासाठी जातीच्या प्रमाणपत्रापासून रहिवासी दाखल्यापर्यंतची सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मात्र, महा-ई-सेवा केंद्रावरील तांत्रिक बिघाडामुळे महाविद्यालयीन प्रवेश देखील रखडल्याने विद्यार्थ्यांकडून प्रशासनाकडे तक्रारी केल्या जात आहेत. तर ज्यांनी अगोदरच दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज केला आहे ते दाखलेही स्वाक्षरीविना प्रलंबित आहेत. सर्व्हर डाउन असल्यामुळे अधिकार्‍यांना लॉग इन करता येत नाही त्यामुळे दाखलाच ओपन होत नसल्याने थम्ब देणार तरी कसा असा सवाल अधिकार्‍यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे समस्या?

सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने दाखल्यांसाठी मोठया प्रमाणावर अर्ज येत आहेत. तसेच शासनाच्या विविध भरती प्रक्रियांच्या शक्यतेमुळे पुर्वतयारी म्हणून दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज करत असल्याने अर्जांची संख्या वाढली आहे. त्यातच संपूर्ण राज्यासाठी एकच क्लाऊड सर्व्हर आहे. संपूर्ण राज्याचे दाखल्यांचे वितरण प्रक्रिया या एकाच सर्व्हरवरून केली जात असल्याने क्लाऊडमध्ये जागेची कमतरता भासत आहे त्यामुळे नवीन अर्ज स्विकारण्यात अडचणी येत आहेत. याकरीता प्रत्येक जिल्हयासाठी स्वतंत्र क्लाऊड सर्व्हर देण्याची मागणी करण्यात आली आहे.

महा-ई-सेवा तसेच सेतू केंद्रांसाठी महाआयटीअंतर्गत एकच क्लाऊड सर्व्हर आहे. या क्लाऊड सर्व्हरमध्ये मोठ्या प्रमाणात विदा (डाटा) संचयित झाला आहे. परिणामी क्लाऊडमध्ये जागा (स्पेस) उपलब्ध नसल्याने जुना संचयित विदा काढण्यात आला आहे. तसेच किरकोळ तांत्रिक बिघाड दूर करून सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या आठवड्यापासून सर्व्हरला तांत्रिक अडचणी येत होत्या. ही समस्या दूर करण्यात आली असून उद्यापासून सर्व्हर पूर्ववत होऊन जलदगतीने दाखले, प्रमाणपत्रांची कामे होऊ शकतील. राज्यातील पुणे, औरंगाबाद विभागातील सेवा केंद्रांना तांत्रिक अडचणी येत आहेत. सर्व्हरवर जादा विदा (डाटा) साठविल्याने ताण येऊन तांत्रिक अडचण आली होती. हा विदा दुसर्‍या सर्व्हरवर स्थलांतरित करण्यात आला असून तो सुरक्षित आहे. : राहुल सुर्वे, राज्य व्यवस्थापक, महाआयटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -