Eco friendly bappa Competition
घर पालघर दगडी चाळीला वाली नाही

दगडी चाळीला वाली नाही

Subscribe

त्यामुळे या चाळीचा कब्जा सध्या भाजी विक्रेत्यांनी घेतला असून या चाळीत ते आपले सामान ठेवत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या चाळीची दुरूस्ती करण्यात यावी, अन्यथा त्या ठिकाणी नवीन इमारत बांधावी अशी मागणी कर्मचारी करीत आहेत.

वाडा: वाडा शहरातील दगडी चाळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या शासकीय निवासस्थानाची अतिशय दुरवस्था झाली असून या निवासस्थानांना सध्या कुलूप लावण्यात आले आहे.त्यामुळे कर्मचार्‍यांना भाड्याच्या घरात राहावे लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसत असून त्यांची गैरसोय होत आहे. मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. तहसीलदार आणि पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांसाठी निवासस्थान म्हणून ब्रिटिश काळात वाडा शहरात तीन दगडी चाळी बांधण्यात आल्या होत्या. यातील दोन चाळींत एक सहाय्यक निबंधक यांचे कार्यालय आहे. तर दुसर्‍या चाळीत तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची कार्यालये आहेत. एका चाळीची प्रचंड दुरवस्था झाली असून छप्परावरील कौले तुटलेली असल्याने पावसाळ्यात खोल्यांना गळती लागते.दरवाजे खिडक्यांची तावदाने तुटलेली असून दगड अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत या चाळीत कोणीही कर्मचारी राहात नाही.या चाळीतील पाच खोल्यांत कर्मचारी आपल्या कुटुंबासह राहायचे मात्र सदरची चाळ धोकादायक बनल्याने गेल्या अनेक वर्षापासून इथे कोणीही कर्मचारी राहात नाही. त्यामुळे या चाळीचा कब्जा सध्या भाजी विक्रेत्यांनी घेतला असून या चाळीत ते आपले सामान ठेवत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या चाळीची दुरूस्ती करण्यात यावी, अन्यथा त्या ठिकाणी नवीन इमारत बांधावी अशी मागणी कर्मचारी करीत आहेत.

दगडी चाळ ही अंत्यत महत्वाची जागा असून शहराच्या मध्यवर्ती भागात आहे.या चाळींना हेरिटेज दर्जा देण्यात आला असून तहसीलदार पोलीस प्रशासनाने या चाळींचे जतन केले पाहिजे.

- Advertisement -

कुणाल साळवी,जिल्हा सचिव,भाजप युवा मोर्चा, पालघर जिल्हा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -