घरक्राइमMumbai Crime : पवईतील ट्रेनी एअर होस्टेसच्या हत्येचा 12 तासांत उलगडा; जखमांच्या...

Mumbai Crime : पवईतील ट्रेनी एअर होस्टेसच्या हत्येचा 12 तासांत उलगडा; जखमांच्या आधारे आरोपीला अटक

Subscribe

मुंबई : मुंबईतील पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (Powai police station limits) एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये रविवारी (3 ऑगस्च) रात्री 24 वर्षीय ट्रेनी एअर होस्टेस रुपल ओगर या तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी रुपल ओगर हिच्या हत्येचा उलगडा केला असून सफाई कामगाराला अटक केली आहे. सध्या कोणत्या कारणामुळे हत्या करण्यात आली याचा तपास करत आहेत. (Mumbai Crime Powai Trainee Air Hostess Murder Solved Within 12 Hours Accused arrested on the basis of injuries)

हेही वाचा – Pakistan : ईशनिंदेच्या आरोपात अडकवण्याचा कट; 17 चर्च, 100 घरांचे नुकसान; फाशीची शिक्षा होणार?

- Advertisement -

24 वर्षीय ट्रेनी एअर होस्टेस रुपल ओगर हिची तिच्या राहत्या घरी गला चिरून हत्या करण्यात आली होती. रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून रुपलचे कुटुंबीय तिच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्या फोनला काहीच उत्तर न दिल्याने तिच्या कुटुंबीयांनी रुपलच्या एका मित्राशी संपर्क साधून तिची माहिती घेण्यास सांगितले. रात्री साडेदहा वाजता रुपलचा मित्र तिच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजा वाजवला मात्र रुपलने काहीच प्रतिसाद न दिल्याने त्याने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला आणि घरात प्रवेश केला. यावेळी त्याला रूपलचा मृतदेह आढळून आला. त्याने तत्काळ 100 नंबर डायल करून पोलिसांना बोलवले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि या प्रकरणी भा द वि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरूवात केली.

रुपल ओगर हत्येप्रकरणी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने तपास सुरू केला. याशिवाय पवई पोलिसांनी आठ विविध पथकं तयार करत तांत्रिक मदतीच्या आधारे तपास सुरू केला. या प्रकरणी सुमारे 30 ते 35 जणांचे जबाब नोंदवण्यात आले होते. ज्यामध्ये बिल्डिंगचे सेक्रेटरी, सेक्युरिटी आणि इतर लोकांचे जबाब घेण्यात आले होते. यावेळी आरोपी सफाई कामगाराच्या अंगावर असलेल्या जखमामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्याची सखल चौकशी केली. दरम्यान त्याने रविवारी सकाळीच रुपल ओगरची हत्या केल्याचे कबूल केले.

- Advertisement -

हेही वाचा – Pune Crime : अरे हे काय महिला पोलीस अधिकाऱ्यावर पोलीस चौकीतच हल्ला; घटनेमुळे खळबळ

पोलिसांनी तपासाला सुरूवात करताना सर्वात आधी सोसायटीतील सर्व सीसीटीव्ही गोळा केले. यावेळी त्यांना आरोपी विक्रम अटवाल (35) हा सफाई कामगार रक्तबंबाळ होऊन पळत असताना दिसला. त्यामुळे पोलिसांनी त्याची तांत्रिक माहिती गोळी केली आणि त्याला पवईतील त्याच्या घरातून अटक केली. दरम्यान, त्याची पत्नीही इमारतीतील कचरा उचलण्याचे काम करते. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास करताना 12 तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. आता ही हत्या चोरीच्या उद्देशाने केली की, आणखी काही उद्देशाने याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसात मुंबईत वारंवार तरुणींवर होणारे हल्ले, अत्याचार आणि हत्यांचे गुन्हे वाढल्याने मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -