घरपालघरप्रशासनाच्या चोख नियोजनामुळे विसर्जन सोहळा सुखकारक

प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे विसर्जन सोहळा सुखकारक

Subscribe

महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त संजय काटकर व पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या निर्देशानुसार सर्वच ठिकाणी करण्यात आलेल्या विसर्जन व्यवस्थेत अनंत चतुर्दशी विसर्जन सोहळा शांतेत, सुरळीत व नियोजबद्ध पद्धतीने पार पडला.

भाईंदर :- मिरा- भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पारंपरिक विसर्जन स्थळांसोबत निर्माण करण्यात आलेल्या दोन कृत्रिम विसर्जन स्थळांवर तसेच नैसर्गिक तलाव/समुद्रात आणि मुर्ती स्वीकृती केंद्रांवर श्रीगणरायाच्या २ हजार १२७ मूर्तींचे विसर्जन व्यवस्थितरित्या संपन्न झाले. पर्यावरणपूरक विसर्जन सोहळा साजरा करण्याकामी एकूण १२४ श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त संजय काटकर व पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या निर्देशानुसार सर्वच ठिकाणी करण्यात आलेल्या विसर्जन व्यवस्थेत अनंत चतुर्दशी विसर्जन सोहळा शांतेत, सुरळीत व नियोजबद्ध पद्धतीने पार पडला.

मिरा -भाईंदर महानगरपालिका आयुक्त काटकर यांनी जेसल पार्क चौपाटी याठिकाणी भेट देऊन विसर्जन पाहणी केली. सदर पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अनिकेत मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड, संजय शिंदे, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत, अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे, सहाय्यक आयुक्त जितेंद्र कांबळे, इतर कनिष्ठ अभियंता, अग्निशमन कर्मचारी व महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते. तसेच आमदार गीता भरत जैन, माजी आमदार, माजी नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक संस्था व महापालिकेचे माजी पदाधिकारी यांनी जेसल पार्क चौपाटी व इतर विसर्जन स्थळांना भेट दिली.

- Advertisement -

बॉक्स

सर्व विसर्जन स्थळांवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा सतर्कतेने कार्यरत होती. स्वयंसेवक संस्था, शैक्षणिक संस्था, एनएसएस, एनसीसी विद्यार्थी, प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी यांनी चौपाटीवर व्यवस्थितरीत्या गर्दीचे नियोजन केले. अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी १ ते ६ प्रभाग समिती कार्यालय क्षेत्रात सर्व यंत्रणा सुसज्ज होत्या.तसेच शहराचे माजी नगरसेवक, माजी पदधिकारी,सर्व नागरिकांनी, गणेश भक्तांनी, गणेश मंडळ यांनी मिरा- भाईंदर महानगरपालिका प्रशासनास अनंत चतुर्दशी दिवशी व इतर विसर्जन सोहळ्यात उत्कृष्ट सहकार्य केल्याने आयुक्त संजय काटकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -