घरपालघरपितरं अशांत नाहीत,कावळेच कमी झालेत

पितरं अशांत नाहीत,कावळेच कमी झालेत

Subscribe

पण सध्या शहरात कावळेही दुर्मीळ झाले आहेत. मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड व पक्ष्यांना लागणारे खाद्य मिळणे कठीण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

जव्हार : सप्टेंबर पंधरवड्या अगोदर पासून पितृपक्षास सुरुवात झाली आहे. पितृपक्षात कावळ्यांना श्राद्ध भोजन खाऊ घालण्याचे विशेष महत्त्व आहे. गरुड पुराणात तर कावळ्यांना यमाचे प्रतीक मानले जाते. श्राद्ध भोजनाचा घास कावळ्याने ग्रहण केला तर पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते, असे मानले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत कावळ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. वाढत्या बांधकामांमुळे झाडे तोडण्यात आली. पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला. परिणामी शहरात पूर्वी दिसणार्‍या कावळ्यांची संख्या कमी झाली आहे. आजघडीला कावळे दिसता दिसत नसून अशात पितृपक्षात अन्नघास देण्यासाठीही कावळे मिळणार काय हे सांगणे कठीणच आहे.जव्हार शहरात इमारती बांधताना अनेक झाडे तोडण्यात आली आहेत, त्यामुळे कावळा या पक्षाची संख्या कमी आहे, कधीकाळी शहरातील प्रत्येक वस्तीत सकाळ, सायंकाळ कावळ्यांची काव… काव… ऐकू यायची. परिसरातील मोठ्या झाडांवर तर कावळ्यांची शाळाच भरायची. पण सध्या शहरात कावळेही दुर्मीळ झाले आहेत. मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड व पक्ष्यांना लागणारे खाद्य मिळणे कठीण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

ज्या भागात मोठ्या वृक्षांची संख्या जास्त असते तेथे कावळे दिसून येतात. बांधकामांसाठी शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. नेटवर्क फ्रिक्वेन्सीचा सुद्धा काही परिणाम त्यामुळे कावळ्यांनीही आपला अधिवास बदलला आहे. कावळ्यांसह अन्य पक्ष्यांची कमी होत चाललेली संख्या चिंताजनक आहे.

- Advertisement -

राजेश पाटील, पक्षी अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -