घरपालघरआधीच डेंग्यू, मलेरिया, न्यूमोनिया त्यात कचरागाडी नादुरुस्त

आधीच डेंग्यू, मलेरिया, न्यूमोनिया त्यात कचरागाडी नादुरुस्त

Subscribe

परिणामी सर्वत्र दुर्गंधी पसरली असून त्यामुळे साथीचे आजार फैलावण्याची भिती निर्माण झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

खोडाळा : सर्वच राजकीय पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत गुंग झाले आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. त्यांचेही सोयीस्कर दुर्लक्ष आहे. तालुक्यात डेंग्यू, मलेरिया, न्यूमोनिया तसेच वातावरणातील आजाराने साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच मोखाडा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा ग्रामपंचायतीची घंटा गाडी गेली दहा दिवसांपासून बंद स्थितीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभी आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यालगत कचरा टाकून मुख्य रस्त्यांनाच कचरा डेपो केला आहे. परिणामी सर्वत्र दुर्गंधी पसरली असून त्यामुळे साथीचे आजार फैलावण्याची भिती निर्माण झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

खोडाळा बाजारपेठेत तालुक्यातील गावांसह लगतच्या जव्हार, वाडा, शहापूर, तालुक्यांसह नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांतील नागरिकांची रेलचेल आहे. येथील बहुतांश नागरीक बाजारहाट करण्यासाठी खोडाळा बाजारपेठेत रोजच येतात. त्यामुळे बाजारपेठेतील दुकानांसह नागरीकांकडून टाकण्यात येणारा कचरा गोळा करण्यासाठी खोडाळा ग्रामपंचायतीने लाखो रूपये खर्च करून घंटा गाडी घेतली आहे. तसेच गावाबाहेर कचरा डेपो केला आहे. सदरची घंटा गाडी गेली दहा दिवसांपासून बंद पडली आहे. ग्रामपंचायतचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. त्यांचे ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष आहे. तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्याने राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते प्रचारात मश्गुल आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया…

स्थानिक ठिकाणी घंटागाडी दुरुस्तीचे काम होत नाही. त्यामुळे उद्या दुरुस्तीसाठी नाशिकला पाठवणार आहे. तसेच गावात लवकरच धूरफवारणी करणार आहोत.
– सुधामती धायतडक, ग्रामसेविका
——-

- Advertisement -

ग्रामसेविकेला वारंवार सांगूनही त्यांनी घंटागाडीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. गावात धूरफवारणी केलेली नाही.
– प्रभाकर पाटील, माजी सरपंच, खोडाळा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -