घरपालघरजिल्हयातील विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्‍यावर

जिल्हयातील विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्‍यावर

Subscribe

पंधरा दिवसांपूर्वी सातपाटी रोडवर झालेल्या अपघातात इन्शुरन्स नसल्याने प्रवाशांना आर्थिक भुदंड सोसावा लागला होता.

पालघरः पालघर जिल्ह्यातील शाळा सुरु झालेल्या असून शालेय विध्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्यासाठी खाजगी बस किंवा मॅजिक, इको कारचा वापर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बहुतेक सर्व खासगी गाड्यांचे इन्शुरन्स काढलेले नसल्याचे समोर आले आहे. कुठे मोठा अपघात घडल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या खासगी गाड्यांना मान्यता नसल्याने शाळाही विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. पंधरा दिवसांपूर्वी सातपाटी रोडवर झालेल्या अपघातात इन्शुरन्स नसल्याने प्रवाशांना आर्थिक भुदंड सोसावा लागला होता.

शालेय बस हे निःसंशयपणे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे सर्वात सोयीचे, सुरक्षित साधन आहे. परंतु दुर्दैवाने, शालेय वाहनातून प्रवास करणार्‍या विद्यार्थ्यांना स्कूल बसच्या सुरक्षेच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अनेक कायदे आहेत. रस्ते आणि परिवहन प्राधिकरणाने या कायद्यांचे फायदे विद्यार्थी आणि पालकांना सारखेच आराम, सुरक्षा आणि सुरक्षितता प्रदान करण्यासाठी सारांशित केले आहे. या फायद्यांमध्ये शाळांमध्ये वेळेवर पोचणे, वाहने सोडल्यामुळे होणारे प्रदूषण कमी करणे आणि वाहतूक कोंडी कमी करणे यांचा समावेश होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -