घरपालघरपालिकेच्या गटार कामात भ्रष्टाचाराची दुर्गंधी

पालिकेच्या गटार कामात भ्रष्टाचाराची दुर्गंधी

Subscribe

त्यामुळे या काँक्रिटची लॅब टेस्ट करण्यात यावी. तसेच सदरच्या निकृष्ट कामाला स्थगिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

वसईः वसई-विरार महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंत्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीमुळे प्रभाग समिती आयमधील गटारकामात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे नियमभंग करत निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदाराविरोधात कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) वसई विभागप्रमुख अमोल म्हात्रे यांनी केली आहे.सांडोर-बंगली-बाभोळा मुख्य रस्त्याशेजारी पाईप गटार बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ठेकेदाराने अंदाजपत्रकातील कामाच्या स्वरूपानुसार काम करणे अपेक्षित असताना सदरच्या कामात अटी-शर्थी व नियमभंग केला आहे. विशेष म्हणजे पाईप टाकण्याअगोदर खोदलेल्या खड्ड्यातील पाणी बाहेर न काढता त्यातच दिलेल्या मोजमापाप्रमाणे पीसीसी (दगड टाकून वर क्राँक्रिट) न करता त्या पाण्यात काँक्रिट ओतले आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट झाले आहे, असा आरोप अमोल म्हात्रे यांनी केला आहे. या कामात वापरण्यात आलेले सिमेंट योग्य क्षमतेचे नाही. त्यामुळे या काँक्रिटची लॅब टेस्ट करण्यात यावी. तसेच सदरच्या निकृष्ट कामाला स्थगिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक प्रभागांत अशाच प्रकारे गटार कामे काढलेली आहेत. मात्र यातील बहुतांश गटारकामे निकृष्ट झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. कामांच्या निविदा कायम ठेवण्यासाठी ठेकेदारांना सुव्यवस्थित गटारे नव्याने बनवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर काही ठिकाणी गटार, फूटपाथ व त्यावर पेव्हर ब्लॉक अशी वेगवेगळी कामे काढून ठेकेदारांना मालामाल केले गेले आहे. मुळात ही सर्व कामे एकाच निविदेत करणे आवश्यक असताना महापालिकेचे वरिष्ठ अभियंता बिनधास्त करदात्या नागरिकांचे पैसे खिशात घालत आहेत. त्यातही काही प्रभागांत कामे न करताच देयके काढल्याच्या नागरिक आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांच्या तक्रारी आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -