घरपालघरभिवंडी - वाडा- मनोर महामार्गाचे भूमिपूजन

भिवंडी – वाडा- मनोर महामार्गाचे भूमिपूजन

Subscribe

तर कित्येक नागरिकांना कायमचे अपंगत्व आले आहे.असा हा सर्वाधिक रहदारीचा व ठाणे व पालघर जिल्ह्यातील रस्त्यांना जोडणारा महत्त्वाचा असलेला रस्त्याचा विषय मार्गी लागत आहे.

वाडा: भिवंडी- वाडा- मनोर या राज्य महामार्गाचा भूमिपूजन कार्यक्रम गुरूवारी धनगर मैदान कुडूस येथे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. भिवंडी – वाडा- मनोर या 65 किलोमीटर लांबीच्या राज्य महामार्गाच्या नव्याने काँक्रिटीकरणासाठी 1200 कोटी किंमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. भिवंडी- वाडा – मनोर हा रस्ता भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जीवन वाहिनी असून अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. भिवंडी – वाडा- मनोर या महामार्गावर गेल्या 15 वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात मोठ -मोठे खड्डे पडत असून रस्त्याची अक्षरश: चाळण होत आहे. त्यामुळे अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहेत. अपघातात 400 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तर कित्येक नागरिकांना कायमचे अपंगत्व आले आहे.असा हा सर्वाधिक रहदारीचा व ठाणे व पालघर जिल्ह्यातील रस्त्यांना जोडणारा महत्त्वाचा असलेला रस्त्याचा विषय मार्गी लागत आहे. या भूमिपूजन सोहळ्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, खासदार राजेंद्र गावित, आमदार शांताराम मोरे, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके,शरद पाटील, माजी आमदार अमित घोडा, विलास तरे, बाबाजी काठोले, नंदकुमार पाटील,भरत राजपूत आदी पदाधिकार्‍यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच भाजपचे वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -