घरपालघरदबक्या पावलांनी येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला

दबक्या पावलांनी येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला

Subscribe

दोन दिवसांपूर्वी वाघ दिसल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर यावर उपाय योजना झाली असती तर त्या वाघाला जेरबंद करण्यात यश आले असते अशी संतप्त प्रतिक्रिया देखील उमटत आहे.

जव्हार: वसंत ऋतूत उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने अन्न पाण्याच्या शोधात जंगली प्राण्यांचा वावर हा मानव वस्तीकडे वाढू लागला आहे. शनिवारी सकाळी जव्हार तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या हातेरी गावानजिक जंगल परिसरात वाघाने दोन पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले आहे. ही घटना कळताच वनविभागाच्या वतीने या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाईसाठी प्रक्रिया केली आहे. गेल्या महिनाभरापासून तालुक्यातील जंगल परिसरात अनेकदा वाघ, बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणी अन्नाच्या शोधात भटकत असून, दिसेल त्या प्राण्यावर झडप घालून त्यांना जिवे मारणे अथवा गंभीर जखमी करणे सारखे प्रकार होत असल्याचे सांगितले जात आहे. यात विशेष करून गाय, म्हैस व शेळी यांच्यावर हल्ला होऊन पशुपालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

जंगल परिसरात वाघ येतो ही बाब वनविभागाला अनेकदा कळवूनही त्यावर हव्या त्या उपाययोजना करण्यात येत नसल्याची खंत पशुपालकांनी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी वाघ दिसल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर यावर उपाय योजना झाली असती तर त्या वाघाला जेरबंद करण्यात यश आले असते अशी संतप्त प्रतिक्रिया देखील उमटत आहे.

- Advertisement -

०००

जव्हार तालुक्यात जंगल व्याप्त भागात वाघ, बिबट्यासारख्या प्राण्यांचा वावर वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले असून त्याबाबत वन विभागाला सूचना देण्यात येतील.

- Advertisement -

— लता धोत्रे, तहसीलदार,जव्हार

०००

हातेरी या गावात पाळीव प्राण्यावर झालेल्या हल्ल्याची नुकसान भरपाई प्रक्रिया म्हणून पंचनामा करण्यात आला आहे. नागरिकांनी भयभित होऊ नये म्हणून जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. शिवाय ज्याठिकाणी नियमित असे प्रकार घडतील अशा ठिकाणी सापळा लावण्यात येईल.

— निरंजन दिवाकर, विभागीय वन अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -