घरपालघरकंचाड फाटा येथे तीन तास वाहतूक कोंडी

कंचाड फाटा येथे तीन तास वाहतूक कोंडी

Subscribe

कुडूस नाक्यावरून चिंचघर या गावाकडे जाणारा रस्ता आहे.या रस्त्यावर अनेक कारखाने व दगडखाणी आहेत.

वाडा: भिवंडी – वाडा महामार्गावरील कुडूस नजीकच्या कंचाड फाटा येथे खड्ड्यात अडकून कंटेनर पलटी झाल्याने येथे सुमारे तीन तास वाहतूक कोंडी झाली होती.यामुळे कामानिमित्त निघालेल्या नोकरदार वर्गाला पुन्हा माघारी फिरावे लागले.
भिवंडी- वाडा महामार्गावरील कुडूस हे एक महत्त्वाचे ठिकाण असून 52 गावांची बाजारपेठ आहे.सद्यस्थितीत कुडूस नाक्याजवळील कंचाड फाटा भागात रस्ता दुरूस्तीचे काम सुरू आहे.त्यामुळे रस्त्याच्या एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. बाजारहाट करण्यासाठी हजारो नागरिक येत असून ते आपली दुचाकी, चारचाकी अशी वाहने रस्त्याच्या कडेला लावून बाजार करण्यासाठी निघून जातात. कुडूस नाक्यावरून चिंचघर या गावाकडे जाणारा रस्ता आहे.या रस्त्यावर अनेक कारखाने व दगडखाणी आहेत.

कारखाने व दगडखाणी यांची मोठी वाहने रस्ता क्रॉसींग करताना वेळ लागतो आणि त्यामुळे वाडा- भिवंडी महामार्गावर वाहतूक कोंडी होते.त्यातच भिवंडी व वाडाकडे जाणार्‍या बसेसचा थांबा नाक्यावरच असून बसचालक बस थांबवताना रस्त्यावरच थांबवत असल्याने वाहतूक कोंडी एवढी होते. त्यामुळे नाक्यावरून दोन मिनिटे अंतर पार करायला अर्धा ते पाऊण तास लागतो.त्यामुळे वाहनचालकांसह नागरिक अक्षरशः कंटाळले आहेत. दरम्यान, कुडूस पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गिते यांनी आजच्या वाहतूक कोंडीची तत्काल दखल घेत वाहतूक पोलिसांना घटनास्थळी पाठवून कंटेनर बाजूला सारून काही तासांत वाहतूक सुरळित केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -